Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Funny video viral : मुलगा चोर आहे, मग हाकलून का नाही देत? पिताश्री म्हणतात…

Funny video : कोरोनाच्या (Corona) महामारीनं मागच्या दोन-अडीच वर्षांपासून सर्वांनाच हैराण केलं आहे. अनेकांचा रोजगार (Job) या काळात गेला. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं. याच विषयाला धरून एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) झालाय.

Funny video viral : मुलगा चोर आहे, मग हाकलून का नाही देत? पिताश्री म्हणतात...
रोजगार-बेरोजगारीवर विनोदी भाष्य
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 7:30 AM

Funny video : सोशल मीडियावर विनोदी व्हिडिओंचा अक्षरश: खजिना आहे. अनेक व्हिडिओ एवढे मजेशीर असतात, की आपलं हसून हसून पोट दुखेल. यूझर्सनाही असे व्हिडिओ पाहायला आवडतात. आवडले की ते मोठ्या प्रमाणावर शेअर होतात. कोरोनाच्या (Corona) महामारीनं मागच्या दोन-अडीच वर्षांपासून सर्वांनाच हैराण केलं आहे. अनेकांचा रोजगार (Job) या काळात गेला. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं. अजूनही ही घडी नीट बसलेली नाही. काही जण तर म्हणतात, खूप शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही. मग एवढं शिकून, त्यावर पैसे खर्च करून काय फायदा? आता याच विषयाला धरून एक व्हिडिओ सध्या चांगला व्हायरल (Viral) झालाय. रोजगार या विषयावर हलकाफुलका विनोद करून आपल्याला हा व्हिडिओ हसवतो.

काय करतात तीन मुलं?

व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतील एकूण पाच जण… त्यातले बसलेले तीन मुले असतात. त्यांच्या मागे असणार मुलगा त्यांचा बाप दाखवलाय. समोर असणारा मुलगा त्याला विचारतो, किती मुलं आहेत? मग तो तीन सांगतो. काय करतात, असं विचारल्यावर म्हणतो, एक डॉक्टर, एक इंजिनिअर तर एक चोर आहे. मग विचारणारा म्हणतो, की चोराला घराच्या बाहेर का नाही हाकलून देत? यावर त्या मुलाचा पिता जे काही उत्तर देतो, ते ऐकून तुम्हाला हसूच येईल.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ कौशल मोंगा (Koushal Monga) या चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे. 23 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला यूझर्स पसंती देत असून 2.8 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यातही वाढच होत आहे. ‘Watch till end’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. (Video courtesy – Koushal Monga)

आणखी वाचा :

काहीही हां..! खाद्यपदार्थांवरचे विचित्र प्रयोग थांबता थांबेना, आता पाणीपुरीचा ‘हा’ Viral video पाहा

Eagle Attack Fox : Video पाहून यूझर्स म्हणतायत, पुतीन यांच्याबाबतीतही असंच होणार!

…म्हणून होत नाही भाऊ आणि बहिणीची भेट; Viral झालाय ‘Salute to Indian army’ Video

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.