लग्नाच्या मंडपातच संयम सुटला… नवरदेव-नवरीच्या नको त्या प्रकारामुळे फोटोग्राफर पळतच सुटला
सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. रोज काही ना काही व्हायरल होत असते. पण हा व्हायरल झालेला व्हिडिओ काहींसाठी त्रासदायक असतो तर काहींसाठी वरदान ठरू शकतो.

नवी दिल्ली | 30 जानेवारी 2024 : सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. रोज काही ना काही व्हायरल होत असते. पण हा व्हायरल झालेला व्हिडिओ काहींसाठी त्रासदायक असतो तर काहींसाठी वरदान ठरू शकतो. असाच एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कपलच वेडिंग फोटोशूट सुरू आहे. फोटोग्राफर्स त्यांना वेगवेगळ्या पोझ द्यायला सांगून फोटो काढत असतो. मात्र त्याच फोटोशूटमध्ये एक वेळ अशी आली की हे कपल अनकंट्रोलेबल झालं आणि फोटोग्राफरला तिकडून पळच काढावा लागला. त्यांनी नेमकं असं काय केलं ?
लग्नाचे फोटो काढायला सर्वांनाच आवडतात. सुंदर तयार होऊन आलेली वधू, अप्रतिम पोशाखात आलेला नवरा मुलगा… लग्नाचे विधी आणि त्यानंतरचं फोटो शूट पहायला सर्वांनाच आवडतं. पण काही वेळा असे फोटो काढतानाही त्रेधा उडू शकते. असाच एक फोटोशूटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नुकतंच लग्न झालेले वर-वधू छान सजून, एकमेकांसोबत उभे आहेत. फोटोग्राफर त्यांचे फोटो काढत, व्हिडीओ शूटिंग करत आहे. त्यांना वेगवेगळ्या पोझही सांगत आहे. त्यानंतर काही वेळाने त्याने त्यांना एका पोझमध्ये उभ राहून फोटो काढण्याबद्दल सांगितलं. त्याचं ऐकून वर-वधू जवळ आले आणि एकमेकांना किस करू लागले. शूटिंग झाल्यावर फोटोग्राफरने त्यांना थांबण्यास सांगितलं. पण ते दोघे एकमेकांमध्ये एवढे गुंतले होते, की आजूबाजूचं भानच राहिलं नाही. पण त्यांचं पॅशनेट किस पाहून, फोटोग्राफरच लाजला आणि त्याने तिथून पळच काढला.
थोड्या वेळाने तो तिथे परत आला तेव्हा, वर-वधू दोघेही नॉर्मल पोझिशनमध्ये उभे होते. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mistar__jp__01 ने शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत 13 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ फक्त व्हायरल होण्यासाठी स्टंट असल्याचे म्हटले आहे .तर बऱ्याच जणांना हा व्हिडीओ मनोरंजक आणि मजेदार वाटला.
View this post on Instagram