Video : हार घालताना मित्र म्हणाला “हॅप्पी बर्थडे!”, नवरीबाईंचा रागराग, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
हा व्हीडिओ deepakbaghel1010 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय. तर 35 हजारपेक्षा जास्त लोकांनी याला लाईक केलंय.
मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे अनेक मजेशीर व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. काही व्हीडिओ पाहून तर पोट धरून हसावं लागतं, इतके ते फनी असतात. आताही एका लग्नातील असाच फनी व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला (Viral Video) मिळत आहे. या व्हीडिओमध्ये वधू-वर एकमेकांना हार घालताना नवरीचं वर्तन पाहून अनेकांना हसू आलंय. अनेकांनी त्याला लाईक आणि कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हायरल व्हीडिओ
सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.या व्हीडीओमध्ये लग्नातल्या हार घालण्याच्या विधीवेळी गंमत घडते.वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. यावेळी वधूच्या मैत्रिणी तिची चेष्टा करायला लागतात. तेव्हा ही नवरीबाई चिडते.तिचा हा सगळा राग तिच्या हार घालण्याच्या प्रक्रियेमध्ये दिसतो. ती रागात नवरदेवाच्या गळ्यात हार घालते. मग नवरदेवही तिच्या गळ्यात हार घालतो. पण तिचं त्याच्याकडेही लक्ष नसतं ती रागातच तिच्या या मैत्रिणींकडे पाहाते. यावेळी व्हीडिओ काढणारी व्यक्ती हॅपी बर्थ डे टू यू, असं म्हणते. विशेष म्हणजे नवरीच्या या चिडलेल्या व्हीडिओला तुम जब ऐसे शरमाती हो, हे गाणं बॅगराऊंडला लावलंय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या व्हीडिओत नवरी आधीच रागात दिसत आहे आणि इतक्यात एकजण हॅपी बर्थडे म्हणतो मग ही नवरीबाई अधिकच चिडते. वधूला हा विनोद अजिबात आवडलेला दिसत नाही आणि ती स्टेजवरूनच आपला राग दाखवताना दिसतेय. दुसरीकडे, वर मात्र शांत दिसत आहे. तो यावर काहीही बोलत नाही. पण वधू मात्र या मित्रांकडे एकटक रागाने पाहात आहे. हा व्हीडिओ deepakbaghel1010 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला हजारो लोकांनी पाहिलंय. तर 35 हजारपेक्षा जास्त लोकांनी याला लाईक केलंय.