Swiggy bag : लखनऊची बुरखा घातलेली ‘मिस्ट्री वुमन’ कोण आहे, ती स्विगी डिलिव्हरी एजंट आहे का?

लखनऊ मधील नदवा कॉलेज परिसरात हा फोटो असून तो कोणीतरी मोबाईलमध्ये क्लिक करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये महिलेच्या पाठीवर स्विगीची बॅग आहे.

Swiggy bag : लखनऊची बुरखा घातलेली 'मिस्ट्री वुमन' कोण आहे, ती स्विगी डिलिव्हरी एजंट आहे का?
Burqa woman carrying a Swiggy bag went viral on Social Media Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 9:12 AM

लखनऊ – मागच्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो चांगलाचं व्हायरल (viral photo)झाला आहे. त्यामध्ये बुरखा घातलेल्या महिलेच्या पाठीवर स्विगी बॅग (Burqa woman carrying a Swiggy bag) लटकलेली दिसत आहे. जेव्हापासून हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तेव्हापासून लोकं सोशल मीडियावर कमेंटच्या माध्यमातून फोटो मागचं सत्य विचारत आहे. काही महिलांनी त्या महिलेचं कौतुकं सुध्दा केलं आहे. हा फोटो लखनऊ मधील नदवा कॉलेज परिसरातील आहे.

लखनऊ मधील नदवा कॉलेज परिसरात हा फोटो असून तो कोणीतरी मोबाईलमध्ये क्लिक करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये महिलेच्या पाठीवर स्विगीची बॅग आहे. त्यानंतर महिलेच्या मेहनतीला अनेकांनी सलाम केला आहे. विशेष म्हणजे त्या महिलेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या महिलेचा चेहरा दिसत नसल्यामुळे ओळख पटवण्यात अनेक अडचणी येत होत्या.

त्या महिलेचं नाव रिजवाना आहे. त्यांना तीन मुलं आहेत. त्यांच्या पतीचं तीन वर्षापुर्वी निधन झालं आहे. तेव्हापासून त्या आपलं कुटुंब चालवण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत. त्यांची एक रिक्षा चोरीला गेल्यापासून त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे.

हे सुद्धा वाचा

रिजवान सकाळी आणि संध्याकाळी धुणीभांड्याचं काम करते. त्यामुळे तिला त्या कामातून दीड हजार रुपये मिळतात. त्याचबरोबर त्या सेल्समनची सुध्दा नोकरी करीत आहेत. ज्यावेळी मी कामासाठी बाहेर पडते. त्यावेळी त्यांना लोकांच्याकडून अश्लील टिप्पणी ऐकायला मिळते असं त्यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्या रोज 20-25 किलोमीटर चालतात. वाचलेल्या प्रवासाच्या खर्चातून घरातील किरकोळ खर्च भागवतात असं सुध्दा त्या म्हणाल्या.

पाठीवर स्विगीची बॅग का आहे ?

रिजवाना या सेल्समनचं काम करतात. त्यांच्याकडे अनेक वस्तू असतात. त्यामुळे त्यांना एक मजबूत बॅगची गरज होती. बाजारात खरेदीसाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना ही बॅग आवडल्यामुळे त्यांनी पन्नास रुपयाला घेतली असल्याचं सांगितलं.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.