आपल्या देशात भले अनेकांना दारूचे व्यसन नसेल, मात्र चहाचे व्यसन असणारे लोक काही कमी नाही. अर्थात हे व्यसन म्हणजे चहाची तलफ. अनेकांना झोपेतून उठल्या उठल्या चहा हवा असतो तर अनेकांना दिवसातून कितीही वेळा चहा मिळाला तरी ते त्या चहाला नाही म्हणत नाही. सध्या सोशल मीडियामध्ये अशाच एका चहाप्रेमी ड्रायव्हरचा व्हिडिओ भलताच वायरल झाला आहे. या ड्रायव्हरचा किस्सा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या ड्रायव्हरने चक्क चहा पिण्यासाठी भर रस्त्यामध्ये बस उभी केली. चहावर इतकं प्रेम की बसच्या मागे गाड्यांची भली मोठी रांग लागली आहे. मात्र तिकडे पाहण्याची देखील तसदी ड्रायव्हरने घेतलेली नाही. त्यामुळे गाड्यांची रांग काही क्षणांतच हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत गेली. पुढे चालकाला इतर गाडीधारकांनी काय लाखोली वाहिली असेल, याची केवळ कल्पनाच केलेली बरे.
men?☕ pic.twitter.com/EDOSmxlnZC
हे सुद्धा वाचा— Shubh (@kadaipaneeeer) January 2, 2023
लांब पल्ल्याचा प्रवास करणारे वाहनचालक चहाचे भारी शौकीन असतात. त्यामुळेच अनेक राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर काही अंतरावर चहाच्या टपऱ्या हमखास उभ्या राहिलेल्या दिसतात. महामार्गावर चहाची टपरी दिसली की अनेक गाडी चालक हमखास गाडी थांबवतात. पण आपण गाडी उभी करताना इतर वाहनांना त्याचा अडसर होणार नाही ना याची खबरदारी वाहनचालक घेतात.
सध्या व्हायरल झालेल्या चालकाच्या व्हिडिओमध्ये मात्र तशी खबरदारी घेतली नसल्याचे दिसत आहे. बस चालकाने भर रस्त्यामध्ये गाडी उभी केल्यामुळे मागे इतर गाड्यांची मोठी रांग लागली आहे.
विशेष म्हणजे त्यामध्ये दुचाकीस्वार देखील अडकले आहेत. बस चालकाने रस्त्यामध्ये बस अशाप्रकारे उभी केली आहे की छोट्याशा गाड्यांना अर्थात दुचाकी, सायकल यांसारख्या लहान गाड्यांना देखील वाट शोधणे मुश्कील झाले आहे.
हा बस चालक नेमका कुठल्या महामार्गावर गाडी चालवत होता हे मात्र कळू शकलेले नाही. या घटनेचे ठिकाण माहीत नसले तरी हा व्हिडिओ संपूर्ण देशभर चांगलाच व्हायरल झाला.
बस चालकाच्या चहाप्रेमाचा अनेकांनी सोशल मीडियामध्ये खरपूस समाचार घेतला आहे. “किती हे चहावरील प्रेम, इतर प्रवाशांची नाही कदर”, “एवढीच चहा प्यायचीच होती, तर घरातून भरपेट चहा का पिऊन आला नाही” अशा अनेक धमाकेदार कॉमेंट्स सोशल मीडियातील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत.