चंद्रावर दुसरं पाऊल ठेवणारे बझ आल्ड्रीन, 93 व्या वाढदिवशी विवाहबद्ध

निल आर्मस्ट्राँगनंतर चंद्रावर उतरणारे बझ आल्ड्रीन यांची त्यांच्या 93 वाढदिवशी आपल्या जुन्या मैत्रिणीशी लगीनगाठ बांधली आहे. त्यांनी ट्वीट करून दिलेली ही बातमी 18 लाख नेटधारकांनी पाहीली. 22 हजाराहून अधिकांनी लाईक केली आहे,

चंद्रावर दुसरं पाऊल ठेवणारे बझ आल्ड्रीन, 93 व्या वाढदिवशी विवाहबद्ध
BUZZALDRINImage Credit source: BUZZALDRIN
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 8:45 PM

न्यूयॉर्क : अमेरीकेच्या अपोलो – 11 मोहीमेतील सहभागी झालेले अंतराळवीर आणि निल आर्मस्ट्राँग पाठोपाठ चंद्रावर दुसरे पाऊल टाकणारे डॉ. बझ आल्ड्रीन यांनी त्याच्या 93 वाढदिवसाला त्यांची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण असलेल्या डॉ. एन्का फॉर यांच्याशी रेशीमगाठ मारत ही गोड बातमी ट्वीटर अकाऊंटवरून जाहीर केली आहे. हे त्यांचे चौथे लग्न आहे. त्यांनी आपल्या पत्नीसोबतचे छायाचित्रही ट्वीटरवर पोस्ट केले आहे. लॉसएंजेलीस येथे झालेल्या एका छोटेखानी समारंभात अमेरीकेच्या अंतराळ मोहीमेचे लिव्हींग लीजंड डॉ. बझ आल्ड्रीन यांनी आम्ही दोनाचे चार झाल्याचे जाहीर केले.

डॉ. बझ आल्ड्रीन यांनी ट्वीटवर म्हटले की माझ्या 93 व्या वाढदिवशी मला हे जाहीर करण्यात अत्यंत आनंद वाटत आहे की माझी अनेक काळापासूनची मैत्रीण डॉ.एन्का फॉर हीच्याशी माझी लग्नगाठ बांधली गेली आहे. एखाद्या अगदी तारूण्याच्या उंबरठ्यावरच असल्यागत वाटत असल्याचे आल्ड्रीन यांनी लिहीले आहे. त्यांनी ट्वीट करून दिलेली ही बातमी 18 लाख नेटधारकांनी पाहीली. 22 हजाराहून अधिकांनी लाईक केली आहे, काही लोकांनी चंद्रावर हनीमुन करा अशीही मजेशीर प्रतिक्रीया दिली आहे.

20 जुलै 1969 रोजी निल आर्मस्ट्राँग यांच्यानंतर आल्ड्रीन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होता. निल आर्मस्ट्राँग यांचा 2014 रोजी जगाचा निरोप घेतला आहे. 16 जुलैला अपोलो -11 निल यांच्या रॉकेट चंद्राच्या दिशेनी उड्डाण केलं आणि 3 दिवसांनी ( 20 जुलैला ) आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रीन चंद्रावर उतरले. त्या रात्री सगळ्या जगाचं लक्ष चंद्राकडे लागलं होतं. रेडिओवर लाईव्ह कॉमेंटरी सुरु होती. कमांडर कॉलिन्स चंद्रा भोवती फेऱ्या मारत राहीले आणि आर्मस्ट्राँग आणि आल्ड्रिन दोघे चंद्रावर उतरले आणि इतिहास घडला. ही मोहीम यशस्वी झाली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.