कोव्हीड पोर्टलऐवजी पॉन साईटची लिंक शेअर, आरोग्य मंत्रालयाचा भोंगळ कारभार!
आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटर हॅन्डलवरून चक्क पॉर्नहब वेबसाईटची लिंक शेअर करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सरकारवर टीका केलीये. कोव्हीड पोर्टलची लिंक ट्विटरवरुन पोस्ट करताना मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पॉर्न वेबसाईटची लिंक पोस्ट करण्यात आली. पॉर्नहब वेबसाईटवरील एका पेजची लिंक मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला.
मुंबई : सरकारी साईटवरून (Government Site) जनहिताची माहिती देणं अपेक्षित असतं. पण जर याच सरकारी साईटवरून पॉर्न व्हीडिओची लिंक शेअर करण्यात आली तर… त्याहून गलथान कारभार तो काय? पण असा प्रकार घडला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) ट्विटर हॅन्डलवरून चक्क पॉर्नहब वेबसाईटची लिंक शेअर करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सरकारवर टीका केलीये. कोव्हीड पोर्टलची लिंक ट्विटरवरुन पोस्ट करताना मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पॉर्न वेबसाईटची लिंक पोस्ट करण्यात आली. पॉर्नहब वेबसाईटवरील एका पेजची लिंक मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. झालेली ही गंभीर आरोग्य मंत्रालयाच्या चूक लक्षात येताच तातडीने हे ट्विट डिलीट करण्यात आलं. कॅनडामधील (Canada) क्युबेकच्या आरोग्य मंत्रालयाकडून अशी गंभीर चूक झाली. ज्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
आरोग्य मंत्रालयाकडून पॉर्नहबची लिंक शेअर
आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटर हॅन्डलवरून चक्क पॉर्नहब वेबसाईटची लिंक शेअर करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सरकारवर टीका केलीये. कोव्हीड पोर्टलची लिंक ट्विटरवरुन पोस्ट करताना मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पॉर्न वेबसाईटची लिंक पोस्ट करण्यात आली. पॉर्नहब वेबसाईटवरील एका पेजची लिंक मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. झालेली ही गंभीर आरोग्य मंत्रालयाच्या चूक लक्षात येताच तातडीने हे ट्विट डिलीट करण्यात आलं. कॅनडामधील क्युबेकच्या आरोग्य मंत्रालयाकडून अशी गंभीर चूक झाली. ज्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण
या सगळ्या प्रकारानंतर आरोग्य विभागावर सडकून टिका झाली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलं. “आमच्या नियंत्रणाबाहेर असणाऱ्या परिस्थितीमुळे आमच्या ट्विटर हॅण्डलवरुन अयोग्य कंटेंटची लिंक पोस्ट करण्यात आली”, असं स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने एएफपी या वृत्तसंस्थेला या संदर्भात पाठवलेल्या मेलमध्ये हे स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणाचा तपास केला जात आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात येत आहे.
नेटकरी का म्हणतात?
आरोग्य मंत्रालयाकडून अशी गंभीर चूक झाल्यानंतर नेटकऱ्यांनी टीका केली नाही तरच नवल! नेटकऱ्यांनी सरकारच्या कामावर कठोर शब्दात टीका केली आहे. एवढी गंभीर चूक आम्हाला आमच्या सरकारकडून अपेक्षित नाही, असं काहींनी म्हटलंय. तर अशी लिंक शेअर करताना डोकं गहाण ठेवून काम केलं जातं का?, असा सवालही नेटकऱ्यांनी विचारला आहे.
पॉर्नहब काय आहे?
पॉर्नहब ही जगभरामध्ये अश्लील कंटेट देणारी साईट आहे. आंबट शौकिनांमध्ये ही साईट प्रसिद्ध आहे. ही वेबसाईट माइंडग्रीक कंपनीच्या मालकीची आहे.
संबंधित बातम्या