मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या तर आश्चर्यात पाडणारा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टिंग करताना त्याच्या पाठीमागे असलेल्या पाण्यात एक कार बुडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (car slides and sink in while live reporting video went viral on social media)
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक रिपोर्ट लाईव्ह रिपोर्टिंग करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हिडीओमध्ये दिसणारा रिपोर्टर हा WCIS या वृत्तसंस्थेचा असून त्याचे नाव जॅकोब इमर्सन (Jakob Emerson) आहे. इमर्सन ज्या ठिकाणी उभे आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या एका सरोवराची निर्मिती करण्यात येत आहे. याच प्रकल्पाची ते माहिती देत आहेत.
इमर्सन माहिती देत असताना एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टिंग करत आहे. मात्र त्याच्या मागे एक कार सरोवरात पडली आहे. हा प्रकार माहिती होताच रिपोर्टरने आपला हजरजबाबीपणा दाखवला आहे. रिपोर्टर कॅमेऱ्याच्या बाजूला झाला आहे. तसेच त्याने कॅमेरामॅनला बुडत असलेली कार दाखवण्यास सांगितले आहे. त्यानंतर कार बुडत असल्याचा हा सर्व थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
?????? pic.twitter.com/Uah0acNmeD
— Brian Floyd (@BrianMFloyd) August 4, 2021
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्टीकरण येथील प्रशासनाने दिले आहे. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
इतर बातम्या :
Video | पाकिस्तानी लोकांचा भलताच खेळ, व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया
VIDEO | ‘एक बार चेहरा हटा दें शराबी’ गाण्यावर नवरा-नवरीचा भन्नाट डान्स, वऱ्हाडी हसून बेजार
Viral Video : फ्लाइट अटेंडंटसोबत गैरवर्तन, प्रवाशाला चक्क विमानातच टेप लावून बांधलं
Tokyo Olympic 2021 : रवीच्या रौप्य पदक विजयानंतर दीपकचं कांस्य पदक थोडक्यात हुकलं, 4-2 ने पराभवhttps://t.co/fnBLZN9RKb#DeepakPunia | #WrestleTokyo | #IndiaAtOlympics
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2021
(car slides and sink in while live reporting video went viral on social media)