सरन्यायाधीश चंद्रचुड यांची 88 लाखांची कार, पण कारचा नंबर का होतोय व्हायरल
न्यायाधीशांना सार्वजनिक जीवन नसते. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात ते अभावानेच दिसतात..भारताचे सरन्यायाधीश दिल्लीतील एका खाजगी कार्यक्रमात एका बिझनेस एक्झुकेटिव्हला दिसले त्याने त्यांच्या कारचा नंबर ट्वीटरवर पोस्ट केला आणि रविवारपासून देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कारचा नंबर व्हायरल होत आहे. काय आहे या नंबरमध्ये...
मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांच्या विषयीच्या बातम्या मिडीयात नेहमीच येत रहातात. परंतू आता वेगळीच बातमी पुढे आली आहे. भारताचे सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या कारचा नंबर प्लेट रविवारपासून सोशल मिडीयावर खूपच व्हायरल होत आहे. कारच्या नंबर प्लेटचा फोटो सोशल साईट एक्सवर ( पूर्वीची ट्वीटर ) बिझनेस एक्झुकेटीव्ह लॉयड मॅथियास यांनी पोस्ट केला आहे. पण या कारच्या नंबरमध्ये असे काय विशेष आहे की तो सर्च केला जात आहे.
भारताचे 50 वे न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या मर्सिडीज कारची नंबर प्लेट खूपच व्हायरल होत आहे. बिझनेस एक्झुकेटिव्ह लॉयड मॅथियास यांच्यासह एका पार्टीला उपस्थित असलेले लोक हा नंबर पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत. त्यांच्या कारचा नंबर DL1 CJI 0001 असा आहे. मॅथियास यांनी सोशल साईट एक्सवर चंद्रचूड यांचा फोटा टाकत एक पोस्ट लिहीली आहे. त्यात त्यांनी लिहीलेय की, काल दिल्लीत एका खाजगी समारंभात भारताचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना बाहेर पडताना पाहीले. त्यावेळी त्यांच्या कारचा नंबर पाहिल्यावाचून राहवले नाही. त्यांच्या कारचा नंबर पाहून बरे वाटले. विचार केला की मुख्य निवडणूक आयोगाच्या कारची नंबर प्लेट काय असेल ? काय आहे या DL1 CJI 0001 नंबर प्लेटमध्ये…
काय आहे कारचे वैशिष्टये
सरन्यायाधीश चंद्रचूड हे वापरत असलेली मर्सिडीज ई 350 डी मॉडेलची आहे. ही कार महागडी आहे त्यामुळे हा नंबर अर्थातच सर्च केला गेला की ही त्यांच्या मालकीची कार आहे की सरकारी ? फ्रि प्रेस जर्नल वृत्तपत्रांतील बातमीनूसार ही कार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्टार यांच्या नावे नोंदणी झालेली आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांना सरकारने दिलेली ही कार आहे. मिर्सिडीज बेंझची ही ई- क्लास ई – 350 डी एएमजी लाईन या कंपनीच्या ई-क्लास लाईन अपची हे टॉप मॉडेल आहे. याची किंमत बाजारात 88 लाख इतकी आहे. ई-350 डी एएमजी लाईन ऑटोमेटीक ( टीसी ) ट्रान्समिशनमध्ये देखील बाजारात मिळते. बाजारात ही चार रंगात उपलब्ध आहेत. ब्लॅक मेटॅलिक, ग्रेफाईट ग्रे, हाय टेक सिल्व्हर मेटॅलिक आणि पोलर व्हाईट अशा रंगात ती उपलब्ध आहे.