Child video : सोशल मीडियावर (Social media) लहान मुलांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, की एखाद्यामध्ये कलागुण असतील तर त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते. रस्त्यावर वस्तू विकणारा भुबन बद्याकर असो की रानू मंडल… अशी एक ना अनेक उदाहरणे आपण पाहतो. मात्र त्यांची परिस्थिती खूपच बिकट होती. मात्र त्यांच्यात गुणवत्ता होती, एकाने आपले गाणे प्रसिद्ध केले तर दुसऱ्याने आपला आवाज. हे सर्व शक्य झाले ते सोशल मीडियामुळे… त्यांच्यातली गुणवत्ता देशवासीयांनी पाहिली. आता मात्र एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होतोय, हा व्हिडिओ एक शाळकरी (School) मुलाचा (Boy) आहे. तो अत्यंत सुरात गाणे गात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ नक्की आवडेल.
व्हिडिओमध्ये शाळेच्या गणवेशात एक छोटा मुलगा दिसत आहे. तो गाणे गात आहे. त्याच्यासमोर काहीही नाही, तरीही तो सुरात आणि न विसरता गाणे गात आहे. ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातील ‘विठु माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला… मायबापा…’ हे प्रसिद्ध गाणे तो गाताना दिसत आहे. मूळ गाणे जयवंत कुलकर्णी, सुधीर फडके, सुरेश वाडकर यांनी गायले आहे. तर या चिमुरड्याचे गाणेही अत्यंत सुंदर झाले आहे.
सुंदर आवाजाचा हा व्हिडिओ मीडिया मराठी (Media Marathi) या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. 15 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला व्ह्यूज आणि लाइक वाढत आहेत. ‘ह्या मुलाचा आवाज एकदा ऐकाच, ऐकल्यावर तुम्हीसुद्धा पूर्ण व्हिडीओ पाहिल्याशिवाय राहणार नाही’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहा…