Back Benchers विद्यार्थ्यांमध्ये ‘अशी’ही प्रतिभा, ‘हा’ Viral Video पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे दिवस

Students Funny Video : सोशल मीडियावर तुम्ही अनेक शाळकरी (School) मुलांचे व्हिडिओ (Video) पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ इतके व्हायरल (Viral) होतात, की ते इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. पोट धरून हसायला लावतात. बॅकबेंचर्स मुलांचा असाच हसवणारा व्हिडिओ पाहू या..

Back Benchers विद्यार्थ्यांमध्ये 'अशी'ही प्रतिभा, 'हा' Viral Video पाहून तुम्हालाही आठवतील बालपणीचे दिवस
कुत्र्यांचे आवाज काढणारे विद्यार्थी (सौ. bhutni_ke_memes)
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 7:30 AM

Students Funny Video : सोशल मीडियावर तुम्ही अनेक शाळकरी (School) मुलांचे व्हिडिओ (Video) पाहिले असतील. यातील काही व्हिडिओ इतके व्हायरल (Viral) होतात, की ते इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. पोट धरून हसायला लावतात. शाळेतील सहदेव दिरदो या लहान मुलानं ‘बचपन का प्यार’ हे गाणे गाऊन देशभर प्रसिद्धी मिळवली तेव्हा त्याच्यातल्या कलागुणाची ओळख आपल्याला झाली. आता काही शाळकरी मुलांचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये वर्गाच्या मागच्या बाजूला बसलेली मुलं अशी टॅलेंट दाखवत आहेत, जी पाहून शिक्षकही हैराण झाले आहेत. त्याचवेळी या बॅकबेंचर्स मुलांचे व्हिडिओ पाहून सगळेच हसत असतात. शिक्षक वर्गाच्या मागच्या बाजूला बसलेल्या मुलांना त्यांची प्रतिभा दाखवायला सांगतात. यानंतर, मुले असे कौशल्य दाखवतात की वर्गात उपस्थित असलेल्या सर्वजणांमध्ये हशा पिकतो.

चार मुलांचा कल्ला

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 लहान मुले दिसतील. शिक्षकांनी या मुलांना त्यांच्यातील कलागुण दाखवायला सांगितल्यावर चारही मुलं एक एक करून कुत्र्याचा आवाज करू लागली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही चार मुलं कुत्र्याचे वेगवेगळे आवाज काढतात. यातील शेवटच्या मुलानं कुत्र्याचा असा आवाज केला, जणू कुत्र्याला कोणीतरी मारलं आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

या मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोक चांगलेच हसायला लागलेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 25 नोव्हेंबरला शेअर करण्यात आला. आता तो पुन्हा व्हायरल होत आहे. यानंतर हा व्हिडिओ आता इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केला जात आहे. व्हिडिओ पाहून यूझर्स खूप मजेशीर कमेंट करत आहेत. व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणत आहेत, की मुलांची मस्ती पाहून आम्हाला आमचे बालपणीचे दिवस आठवले. त्याचबरोबर मुलांची प्रतिभा अप्रतिम असल्याचंही अनेकजण सांगत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

#Earthquake: जम्मू-काश्मीरपासून दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के तर सोशल मीडियात पडतोय मीम्सचा पाऊस

Viral : तुम्हाला फोडता येतील का असे फुगे? 20 मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेलाय ‘हा’ 10 सेकंदांचा Video

Dancing Dadलाही Kacha Badamची भुरळ, मुलासह दिला जबरदस्त परफॉर्मन्सनंतर! यूझरच्याही मजेशीर कमेंट्स

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.