Video : ऐकावं ते नवलच! चक्क हिरव्या मिरचीपासून बनवलं आईस्क्रीम, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ खूप चर्चेत आहे. कारणही तसंच खास आहे. हा व्हीडिओ आहे आईस्क्रिमचा हे आईस्क्रिम सध्या अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनलं आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती हिरव्या मिरचीचे आईस्क्रीम बनवत आहे.
मुंबई : उन्हाळा (Summer) सुरू झालाय. अश्यात थंडाव्यासाठी आईस्क्रीम (ice cream) खाल्लं जातं. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम खाल्ले असतील. रस्त्यावर मिळणाऱ्या आईस्क्रीमची तर मजाच न्यारी. पण सध्या एक वेगळंच आईस्क्रीम सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ते मिरचीचं आईस्क्रीमचं… होय हिरव्या मिरचीचं आईस्क्रीम (chilli ice cream)… सध्या या आईस्क्रीमची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हे आईस्क्रीम बनवण्यापासून ते ग्राहकांनी खाण्यापर्यंतचा हा व्हीडिओ आहे. हा व्हीडिओ सध्या वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनेकांनी कमेंट करून हे आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
व्हायरल व्हीडिओ
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ खूप चर्चेत आहे. कारणही तसंच खास आहे. हा व्हीडिओ आहे आईस्क्रिमचा हे आईस्क्रिम सध्या अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनलं आहे. या व्हीडिओमध्ये एक व्यक्ती हिरव्या मिरचीचे आईस्क्रीम बनवत आहे. ती व्यक्ती प्रथम ट्रेवर चार मिरच्या ठेवते आणि त्यावर चॉकलेट सिरप टाकते. मग ती व्यक्ती पुन्हा चॉकलेट सिरप आणि क्रीम टाकून मिरची बारीक कापून पातळ पेस्ट बनवते. थंड झाल्यावर रोल बनवून मिरचीसह सर्व्ह करते. व्हीडिओमध्ये काही महिला हे चिली आईस्क्रीम खाताना दिसत आहेत.
View this post on Instagram
गौरव वासन या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला दिलेलं कॅप्शनही अनेकांचं मन वेधून घेत आहे. जगाचा अंत जवळ आला आहे का? तुम्हाला हे आईस्क्रीम खायला आवडेल का? असाही सवाल या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये विचारण्यात आला आहे.
या व्हीडिओला साठ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेटं करत आपलं मत मांडलंय. एका नेटकऱ्याने म्हटलंय की व्हा काय शक्कल लढवली आहे. दुसरा म्हणतो, हटके प्रयोग. तिसऱ्याने जरा वेगळी कमेंट केली आहे. तो म्हणतो, या अश्या लोकांमुळेच 2020 मध्ये कोरोना आला होता. चौथ्याने भन्नाट कमेंट केली आहे. असलं आईस्क्रीम कधीही खालेल्लं नाही. हे आईस्क्रीम खाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तर आणखी एकजण म्हणतो, तिखट आईस्क्रीम खायला हवं…
संबंधित बातम्या