Chimpanzee dance video : आता चिंपांझीलाही आवरला नाही मोह; ‘श्रीवल्ली’वर असा काही डान्स केली, की यूझर्स खूश!

Chimpanzee Srivalli dance : अल्लू अर्जन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika mandanna) यांचा 'पुष्पा' (Pushpa) चित्रपट आल्यापासून धुमाकूळ घालत आहे. आता चिंपांझीने (Chimpanzee) 'श्रीवल्ली'वर डान्स करून सोशल मीडिया (Social media) यूझर्सना थक्क केले आहे.

Chimpanzee dance video : आता चिंपांझीलाही आवरला नाही मोह; 'श्रीवल्ली'वर असा काही डान्स केली, की यूझर्स खूश!
श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना चिंपांझीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 11:10 AM

Chimpanzee Srivalli dance : अल्लू अर्जन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika mandanna) यांचा ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपट आल्यापासून धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अप्रतिम व्यवसाय केला असून ‘पुष्पा’ अभिनेता अल्लू अर्जुनची ओळख राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय अशी झाली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांवर लोकांनी जोरदार रील्स बनवले आणि सोशल मीडियावर शेअर केले. ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘श्रीवल्ली‘ या गाण्याची वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. या गाण्यावर लोकांनी जबरदस्त व्हिडिओ बनवले आणि सोशल मीडियावर शेअर केले आणि लाइक्स आणि कमेंट्स त्यांना मिळाले. या गाण्याची क्रेझ सर्वांच्याच डोक्यात गेली. आता या गाण्याचा ज्वर चिंपांझीवरही चढताना दिसतोय. चिंपांझीने (Chimpanzee) ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर डान्स करून सोशल मीडिया (Social media) यूझर्सना थक्क केले आहे. चिंपांझीचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की श्रीवल्ली’ गाण्यावर चिंपांझी अल्लू अर्जुनच्या स्टाईलला हिट करताना दिसत आहे. हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे, की त्याला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला 11 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. dinesh_adhi नावाच्या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूझर्सही हैराण झाले आहेत. पाहा हा व्हिडिओ –

View this post on Instagram

A post shared by Dinesh Sanu (@dinesh_adhi)

अल्लू अर्जुनची स्टाइल कॉपी

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक चिंपांझी प्राणीसंग्रहालयात फिरत आहे, तेव्हाच श्रीवल्ली हे गाणे तेथे वाजण्यास सुरुवात होते. यानंतर चिंपांझी अल्लू अर्जुनची स्टाईल कॉपी करू लागतो आणि या गाण्याच्या तालावर नाचू लागतो. अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये चालताना चिंपांझी उभा राहून नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. याआधी तुम्ही क्वचितच कोणत्याही चिंपांझीला नाचताना पाहिले असेल.

आणखी वाचा :

Shocking video : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; 3 सेकंदांत कोसळली 5 मजली इमारत, धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

कामाविषयी समर्पण हवं ‘असं’; समोर इमारत बॉम्बनं जमीनदोस्त होत होती, ‘तो’ मात्र जागेवरून हलला नाही..!

शिवथाळीची ऐशी-तैशी..! चक्क शौचालयात धुतली जात आहेत भांडी, संतापजनक Video viral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.