प्रेयसीला 10 मिनिटे किस केल्यावर बहिरा झाला बॉयफ्रेंड, डॉक्टरांनी दिले उत्तर
तरुणीला किस करीत असताना बॉयफ्रेंड बहिरा झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही घटना हास्यास्पद आहे. परंतु खरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्या बॉयफ्रेंडने १० मिनिटं किसं केल्यानंतर तो बहिरा झाला आहे.
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक प्रकरण चांगलचं व्हायरल झालं आहे. एका बॉयफ्रेंडला प्रेयसीला किस करणं चांगलचं महागात पडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडने (boyfriend) प्रेयसीला किस केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे कपल एका ठिकाणी डेटवरती गेलं होतं. तिथं ही घटना घडली आहे. प्रेयसीला १० मिनिटं किस केल्यानंतर त्या तरुणीची (Chinese Man Became Deaf) अशी अवस्था झाली आहे. हे प्रकरण खरंच खूप गंभीर आहे.या गोष्टीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. अशा बातम्या सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात. सध्या व्हायरल झालेलं प्रकरण चीन (China) देशातील झेजियांग प्रांतच्या वेस्ट लेक परिसरातील आहे.
हा प्रकार मागच्या महिन्यातील आहे. एक कपल एकमेकांना किस करीत होतं. त्यावेळी बॉयफ्रेंडच्या कानात अचानक दुखायला सुरुवात झाली. त्यानंतर त्या तरुणाला तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर त्या तरुणाला तपासत असताना सुध्दा त्याच्या कानात दुखत होतं. त्यावेळी त्या डॉक्टरांना त्या तरुणाच्या कानात एक होल असल्याचं दिसलं.
डॉक्टरांनी सांगितलं कारण
हा सगळा प्रकार एक्साइटमेंटमुळे झाला आहे. फास्ट किस करण्यामुळे त्या मुलाच्या कानात दुखायला सुरुवात झाली. चुंबनामुळे शरीरात थरकाप निर्माण झाला आणि त्यामुळे मुलाला त्रास झाला. सध्या हे प्रकरण ठीक आहे. त्या मुलाला ठीक व्हायला दोन ते तीन महिने लागतील असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
असं पहिल्यांदा झालेलं नाही. याच्याआगोदर सुध्दा 2008 साली असा प्रकार उजेडात आला होता. चीनमध्येचं असा प्रकार एका महिलेसोबत झाला होता. चीनमध्ये घरात टिव्ही पाहणाऱ्या एका जोडप्याचा आवाज अचानक बंद झाला.