…अन् CISF जवानानं ‘असा’ वाचवला चिमुरडीचा जीव! लोक म्हणतायत, हेच खरे ‘हिरो’; Metro video viral

Child rescue video : एका चिमुरडीचा बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये मुलगी खेळत असताना मेट्रो स्टेशनच्या (Metro) ग्रीलवर गेली. सीआयएसएफ जवानाने तिला वाचवले.

...अन् CISF जवानानं 'असा' वाचवला चिमुरडीचा जीव! लोक म्हणतायत, हेच खरे 'हिरो'; Metro video viral
दिल्ली मेट्रो स्टेशनच्या ग्रीलमध्ये अडकलेल्या चिमुरडीला सीआयएसएफ जवानानं वाचवलंImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 10:37 AM

Child rescue video : एका चिमुरडीचा बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये मुलगी खेळत असताना मेट्रो स्टेशनच्या (Metro) ग्रीलवर गेली. मात्र तिथं ती अडकली आणि जोरजोरात रडू लागली. त्याचवेळी मुलीचा आवाज ऐकून एक सीआयएसएफ जवान तिला वाचवण्यासाठी लगेच ग्रीलवर चढला. मुलीच्या बचावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयएएस अधिकाऱ्यानेही ही क्लिप शेअर केली आहे. त्यांनी जवानाचे कौतुक करताना लिहिले आहे हिरो… त्याचवेळी सोशल मीडियावरचे यूझर्सही जवानाचे कौतुक करत आहे. ही घटना दिल्लीतील निर्माण विहार मेट्रो स्टेशनची आहे. जिथे एक मुलगी खेळता खेळता इमारतीच्या रेलिंगवर पोहोचते. मात्र, एवढ्या छोट्या ठिकाणी मुलगी कशी पोहोचली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

मेट्रो स्टेशनखालीच राहते चिमुकलीचे कुटुंब

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सीआयएसएफ जवानालाही मुलगी ज्या ठिकाणी अडकली आहे तिथून तिला बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. या मुलीचे कुटुंब या मेट्रो स्टेशनखाली राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. सीआयएसएफला ग्रीलमध्ये अडकलेल्या मुलीची माहिती मिळताच त्यांचा एक जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचला आणि त्यांनी आपली हुशारी दाखवत मुलीला सुखरूप बाहेर काढले. जवान चिमुरडीला वाचवत असताना तिथे उपस्थित लोकांनी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला, जो सध्या व्हायरल होत आहे.

ट्विटरवर शेअर

चिमुकलीच्या बचावाचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने शेअर केला जात आहे. हे IAS अवनीश शरण यांनीदेखील हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 1 मिनिट 15 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सीआयएसएफ जवान अत्यंत काळजीपूर्वक ही मुलगी ज्या ठिकाणी अडकली आहे, त्या ठिकाणी पोहोचतो. मात्र, सुदैवाने त्याने मुलीला कोणताही त्रास न होऊ देता तिथून सुखरूप बाहेर काढले. हे पाहून लोक या तरुणाचे खूप कौतुक करत आहेत.

आणखी वाचा :

खड्ड्यात पडलेल्या आपल्या शावकांना ‘असं’ वाचवते सिंहिण, Video viral

…जेव्हा शेळीला राग येतो..! पाहा शेळी आणि मोर यांच्यात झाली लढाई, Video viral

हाती घेऊन अक्षरं गिरवण्यास शिकलो, ती पेन्सिल तयार होते तरी कशी? पाहा ‘हा’ Informative short video

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.