अजबच ! रेझ्युमे गेला उडत… राशीभविष्य पाहून ही आयटी कंपनी देतेय नोकरी

चीनमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. सध्या चीनच्या एका कंपनीच्या नोकरीची जाहिरात प्रचंड चर्चेत आहे. या कंपनीने नोकरी देताना रिझ्युमे ऐवजी राशीला अधिक महत्त्व दिलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कंपनीवर सोशल मीडियातून टीका केली जात आहे.

अजबच ! रेझ्युमे गेला उडत... राशीभविष्य पाहून ही आयटी कंपनी देतेय नोकरी
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 12:17 PM

प्रत्येकजण चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि कंपन्याही योग्य उमेदवारालाच चांगली नोकरी देतात. त्याचा अनुभव, शिक्षण आणि एक्सपर्टीज या गोष्टी लक्षात ठेवून कंपन्या योग्य उमेदवार निवडत असतात. तर बड्या कंपनीत नोकरी मिळावी म्हणून उमेदवारांकडून चांगल्यातील चांगला रेझ्युमे तयार केला जातो. चांगला रेझ्युमे करून छाप पाडण्याचा प्रयत्न असतो. पण एका कंपनीने तर नोकरी देण्याची अजबच तऱ्हा सोडून काढली आहे. एक आयटी कंपनी चक्क उमेदवाराचा रेझ्युमे पाहण्याऐवजी त्याची रास आणि कुंडली पाहून नोकरी देत आहे. विशेष म्हणजे बॉसच्या कुंडलीशी ज्याची रास मॅच करतेय अशांनाच नोकरी दिली जात आहे. त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.

कम्युनिस्टांचा प्रभाव असलेल्या चीनमध्ये हा प्रकार दिसून आला आहे. ग्वांगझू, गुआंगडोंगच्या एका चीनी कंपनीने नुकतीच नोकरीची जाहिरात दिली आहे. त्यात ‘डॉग इयर’मध्ये जन्मलेल्या लोकांनी नोकरीसाठी अप्लाय करू नये असं स्पष्ट म्हटलं होतं. या काळात जन्मलेल्या लोकांनी अर्ज केल्यास त्यांचा अर्ज बाद केला जाणार असल्याचंही या कंपनीने म्हटलं आहे.

कसं आहे चिनी राशीचक्र ?

चीनचं राशीचक्र 12 प्राण्यांवर अवलंबून आहे. या राशींमध्ये एक एक प्राणी चिन्ह म्हणून वापरला गेला आहे. उंदीर, बैल, वाघ, ससा, ड्रॅगन, साप, घोडा, बकरी, माकड, कोंबडा, कुत्रा आणि डुक्कर आदी प्राण्यांचा चिन्ह म्हणून वापर करण्यात आला आहे. हे चक्र 12 वर्षात पूर्ण होतं. तसेच प्रत्येक व्यक्तीचा जन्म एका स्पेशल प्राण्याच्या राशीशी जोडलेला असतो. ही प्रणाली सूर्य कॅलेंडर शिवाय चंद्र कॅलेंडरवर आधारीत आहे.

डॉग इयरमधील लोक का नको?

कंपनीने प्रशासकीय स्टाफसाठी जाहिरात दिली होती. त्यात कार्य अनुभव, ऑफिस सॉफ्टवेअरची माहिती देतानाच 4,000 युआन पगार देण्याची ऑफर देण्यात आली होती. त्यात एक वाक्यही लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष त्या शब्दाकडे गेले. ‘डॉग इयर’मध्ये जन्मलेल्या लोकांनी कृपया बायोडाटा पाठवू नये, असं या जाहिरातीत म्हटलं होतं. या जाहिरातीमुळे चीनी सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लोक या जाहिरातीवर टीका करत आहेत. कंपनी नागरिकांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

एका रिपोर्टनुसार, कंपनीच्या बॉसचा जन्म ‘ड्रॅगन इयर’मध्ये झाला आहे. ‘डॉग इयर’मध्ये जन्मलेल्या लोकांशी त्यांचे वाद होऊ शकतात. खटके उडू शकतात. त्यांच्याशी सूत जुळणार नाही, असं कंपनीच्या बॉसला वाटत आहे. त्यामुळे कंपनीच्या ग्रोथला ब्रेक बसू शकतो म्हणूनच त्यांनी ही अट ठेवल्याचं सांगितलं जात आहे.

लोक भडकले

चीनमध्ये नोकरी देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. पण या राशीच्या जाहिरातीमुळे लोक भडकले आहेत. लोकांमध्ये सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘डॉग इयर’मध्ये जन्मलेल्या लोकांनी या कंपनीच्या बॉस विरोधात कोर्टात खटला दाखल करावा, असा सल्ला दिला जात आहे. वयाच्या 35 व्या वर्षानंतर नोकरी मिळणं कठिण आहे, असं मला नेहमी वाटायचं. पण आता माझी रास सुद्धा माझ्या नोकरीसाठी अडचण ठरू शकते हे मला माहीत नव्हतं, असं एका यूजर्सने म्हटलं आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.