UPSC च्या मुलाखतीत नापास झाला तरीही उमेद हरला नाही, अधिकारी बनूनच घरी परतला…

मुलाखतीच्या आधी बहीण रात्रंदिवस जागून मला मुलाखतीचा सराव करायला लावत होती. त्याच वेळी मुलाखत द्यावी कशी उत्तर सांगावी कशी त्याचा सराव माझी बहीण करून घेत होती.

UPSC च्या मुलाखतीत नापास झाला तरीही उमेद हरला नाही, अधिकारी बनूनच घरी परतला...
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 5:55 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एटा येथील अजय यादवची यूपीपीएससी परीक्षेत निवड झाली. अजय यादव याची पोलीस उपअघीक्षक म्हणून निवड झाली आहे. ही गोष्ट जेव्हा त्याच्या घरात समजली तेव्हा मात्र त्याचं घर सगळं आनंदून गेलं. ही बातमी बघता बघता गावात समजली आणि सगळं गाव अजयच्या घरी त्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी जमा झालं. तर दुसरीकडे नातेवाईकांचे फोनही चालू झाले.

अजय यादव हा जैथारा ब्लॉकच्या कांठीगरा गावचा रहिवासी आहे. त्यांनी प्रारंभीचे शिक्षण जिल्ह्याच्या ठिकाणीच घेतले. त्याने 2010 मध्ये हायस्कूलमधील शिक्षण पूर्ण केले आणि 2012 मध्ये इंटरमिजिएट उत्तीर्ण झाला.

त्यानंतर त्यांनी मेहनतीने आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश मिळवला. त्या ठिकाणाहून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी नागरी सेवांची तयारी सुरू केली.

वडील जितेंद्र सिंह सांगतात की, अजय 2022 मध्ये नागरी सेवा परीक्षेला बसला होता. तेव्हा तो यशस्वी झाला. मात्र काही कारणास्तव त्याची मुलाखत चांगली झाली नाही आणि तो नापास झाला.

त्यामुळेच त्याची परीक्षेत अंतिम निवडही होऊ शकली नाही. त्यानंतर तो तिथेच थांबला नाही आणि निराशही झाला नाही. त्याने पुन्हा परीक्षेची तयारी चालू ठेवली. मात्र त्याचवेळी अजयने UPPSC 2022 ची परीक्षाही देण्याचे ठरवले होते.

त्याने UPPSC 2022 ची परीक्षा दिली आणि त्याच्या कष्टाच्या बळावर त्याला त्याला पहिल्याच प्रयत्नात यशही मिळाले. आणि पोलीस उपअधीक्षक पदी निवडही झाली.

त्याच्या या यशावर त्याने सांगितले की, त्याला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. धाकटा भाऊ अभिषेक यादव यानेही दिल्ली आयआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर बहिण आभा शालेय शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.

त्याच्या या यशावर अजय म्हणतो की, आज तो यशस्वी झाला आहे, त्यामुळे त्याचे काका आणि सर्वेंद्र सिंह यादव आणि बहीण आभा यादव यांचे यात मोठे योगदान आहे.

मुलाखतीच्या आधी बहीण रात्रंदिवस जागून मला मुलाखतीचा सराव करायला लावत होती. त्याच वेळी मुलाखत द्यावी कशी उत्तर सांगावी कशी त्याचा सराव माझी बहीण करून घेत होती.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.