हा कोविड बॅचचा इंजिनीयर दिसतोय! नविन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये उभा केला विजेचा खांब

| Updated on: Aug 25, 2022 | 10:22 PM

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात रेल्वेच्या तिसऱ्या ट्रॅकचे काम जोरात सुरू आहे. यावेळी एका इंजिनीयरने विचित्र कारनामा केला आहे. इलेक्ट्रिक कंत्राटदाराच्या एका इंजिनीयरने नव्या ट्रॅकच्या मधोमधच विजेचा पोल उभा केला आहे. याचे फोटो व्हायरल होत आहेत. रेल्वेच्या स्मार्ट इंजिनीअरिंगचा उत्तम नमुना असंत म्हणत खिल्ली उडवली जात आहे.

हा कोविड बॅचचा इंजिनीयर दिसतोय! नविन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये उभा केला विजेचा खांब
Follow us on

इंदूर : इंजिनीयर हे त्यांच्या कौशल्यपूर्ण कामामुळे चर्चेत येतात. मात्र, हेच इंजिनीयर कधी कधी असं कौशल्य दाखवतात की त्यांचं काम पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही. अशाच एका मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) इंजिनीयरच्या कामाचा नमुना सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या इंजिनीयरने नविन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये विजेचा खांब( electric pole) उभा केला आहे. यामुळे रेल्वे जाणार कशी अशी स्थिती निर्माण झालेय. इंजीनीयरने केलेल्या या अजब कामाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. हा कोविड बॅचचा इंजिनीयर दिसतोय अशी कमेंट अनेक युजर्सनी केली आहे. युजर्सच्या कमेंटमुळे हा व्हिडिओ आणखीच व्हायरल होत आहे.

सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली

मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात रेल्वेच्या तिसऱ्या ट्रॅकचे काम जोरात सुरू आहे. यावेळी एका इंजिनीयरने विचित्र कारनामा केला आहे. इलेक्ट्रिक कंत्राटदाराच्या एका इंजिनीयरने नव्या ट्रॅकच्या मधोमधच विजेचा पोल उभा केला आहे. याचे फोटो व्हायरल होत आहेत. रेल्वेच्या स्मार्ट इंजिनीअरिंगचा उत्तम नमुना असंत म्हणत खिल्ली उडवली जात आहे. मात्र, या रेल्वे मार्गाचे काम नीट झाल्याचा दावा रेल्वेकडून केला जात आहे. यामध्ये कोणतीही चूक झालेली नाही असे देखील या रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बीना-कटनी स्थानकांदरम्यान नव्या

ट्रॅकवर दोन ठिकाणी रेल्वे ट्रॅकच्या मध्ये पोल उभे केले

मध्य प्रदेशातील बीना-कटनी स्थानकांदरम्यान रेल्वेच्या नव्या ट्रॅकचे काम सुरू आहे. नरयावली ते ईसरवाराच्यामध्ये टाकण्यात आलेल्या साडेसात किमीच्या रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी ट्रॅकच्यामध्येच अशा प्रकारे इलेट्रीक पोल उभे करण्यात आले आहेत.

आता सगळचं डबल काम झालं

एका कंत्राटदाराला हे ट्रॅक उभारणीचे काम देण्यात आले होते. रेल्वे ट्रॅक टाकल्यानंतर इलेक्ट्रिक विभागाने या ट्रॅकच्या मधोमधच दोन ठिकाणी विजेचा खांब उभे केले आहेत. पोल हटवणे शक्य नसल्यामुळे आता नव्या ट्रॅकला एक किमीपर्यंत बाजूला सरकवावे लागणार आहे.

डबल कामामुळे जनतेचा पैसा वाया

रेल्वे ट्रॅकचे काम सुरु असतानातच इलेक्ट्रीक विभाग आणि ट्रॅक उभारणारा कंत्राटदार यांच्यात समन्वयच झाला नाही. कंत्राटदाराने मध्यवर्ती ट्रॅकशी अलायमेंट जुळविली नाही आणि त्या ट्रॅकपासून तीन ते पाच मीटर अंतरावर नवा ट्रॅक उभा केला. इलेक्ट्रिक विभागाने तर यापेक्षाही मोठा घोळ घातला. यांनी तर डायरेक्ट रेल्वे ट्रॅकच्या मधोमधच पोल टाकला. या हे सर्व काम पुन्हा करावे लागणार आहे. यात पुन्हा पैशाची नासाडी होणार आहे. ऐवढं सगळं होऊनही रेल्वे प्रशासन आपली चुक मान्य करायलाच तयार नाही.