Video: मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं म्हणतात…
Video: दर्शनासाठी आलेल्या भक्ताला सुरक्षा रक्षकाने मंदिरात खेचून-खेचून मारले, मग...
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) वृंदावन (Vrindavan) मधील बांके बिहारी मंदिरातील (Banke Bihari Temple) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ एका वेगळ्या कारणासाठी व्हायरल झाला आहे. दोन गटात मारहाण झाल्याचा तो व्हिडीओ आहे. देवळात दर्शनासाठी आलेल्या भक्त आणि सुरक्षा रक्षकांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. हा व्हिडीओ दर्शनासाठी गेलेल्या एका व्यक्तीने मोबाईल कैद केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून लोकं त्यावर दोन्ही बाजूने कमेंट करीत आहेत.
बांके बिहारी मंदिर अधिक प्रसिद्ध आहे. तिथं दर्शन घेण्यासाठी भक्त लांबून-लांबून येत असतात. सुरक्षा रक्षक आणि दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये जोरदार वाद झाला आहे. ज्यावेळी दोघांची भांडण सुरु होतात. त्यावेळी तिथं असलेले इतर सुरक्षा रक्षक तातडीने धाव घेतात. परंतु तरीही भक्तांचा आणि सुरक्षा रक्षकांचा वाद सुरुचं राहतो.
View this post on Instagram
हा वाद नेमका कोणत्या गोष्टीमुळे झाला अद्याप अस्पष्ट आहे. परंतु काहीजण सोशल मीडियावर सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. तर काहीजण दर्शनासाठी गेलेल्या भक्ताला दोष देत आहेत. त्याचबरोबर भक्तावर सुध्दा कारवाई झाली पाहिजे असा नाराजीचा सूर काहीजणांनी सोशल मीडियावर घेतला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून याची अनेकांनी दखल घेतली आहे. त्याचबरोबर वाद कोणत्या कारणामुळे झाला याची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. नेमकं कारण समजल्यावर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.