कपल हॉटेलमध्ये कॉफी प्यायले, बिल आले तब्बल 3.6 लाख रूपये, कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल
दोघेजण प्रसिद्ध स्टारबक्स कॅफेमध्ये गेले होते. कॉफी पिल्यानंतर घरी पोहचल्यावर त्यांना बिल कापल्याचा मॅसेज आला आणि बिल पाहून धक्काच बसला. त्यानंतर ते पळतपळत स्टारबक्समध्ये पोहचले.
दिल्ली : आपण नेहमी कुटुंबियासोबत किंवा जोडीदारासोबत हॉटेलिंगसाठी बाहेर जात असतो. परंतू विचार करा एक कपल कुठल्या तरी फेमस कॉफी शॉपमध्ये कॉफी किंवा स्नॅक्स खायला गेलेलो आहोत आणि त्यांच्या सोबत काही विचित्र घडले तर आपल्याला काय वाटेल. अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. जेव्हा एक कपल एका प्रख्यात कॉफी शॉपमधून कॉफी पिऊन आरामात घरी परतले आहे. आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून अचानक सुमारे साडे तीन लाख रूपये कापले गेले असल्याचा मॅसेज जर आला असेल तर तुमची काय हालत होईल. त्यानंतर त्या कपलची काय अवस्था झाली असेल..
कपल कॉफी पिण्यासाठी गेले होते
मिडीयात आलेल्या बातमी नूसार ही घटना अमेरिकेतील स्टारबक्स हॉटेलात मधली आहे. या हॉटेलात जेसी आणि ओडेल हे कपल कॉफी पिण्यासाठी गेले होते. त्यांच्या सोबतच ही विचित्र घटना घडली होती. ही घटना ते कॉफी पिऊन घरी परतले तेव्हा घडली. त्याने जेव्हा आपले क्रेडिट कार्डचा मॅसेज पाहीला. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या खात्यातून चक्क साडेतीन लाख रूपये कापले होते. केवळ दोन कप कॉफीचे इतके बिल झाल्याचे पाहून या कपलचे धाबे दणाणले. आणि त्यांनी सरळ पुन्हा त्या रेस्ट्रारंटच्या दिशेने निघाले.
खात्यातून इतके पैसे कापले गेले
रिपोर्टनूसार हे दोघेजण प्रसिद्ध स्टारबक्स कॅफेमध्ये गेले होते. आणि कॉफी पिल्यानंतर घरी पोहचल्यावर त्यांना बिल कापल्याचा मॅसेज आला. त्यानंतर ते पळतपळत स्टारबक्समध्ये पोहचले. आणि आपला वेळ आणि नाव सांगत त्यांनी बिल चेक केले. तेव्हा संपूर्ण कहानी उलगडली. कॅफेने त्यांचे बिल पुन्हा रिप्रिंट केले. तेव्हा त्यांचा आरोप खरा निघाला. एका अमेरिकन जोडप्याच्या मते, स्टारबक्सने त्यांच्याकडून 10 डॉलरऐवजी ( 820 रू.) दोन कप कॉफीसाठी $4,456.27 (₹3.6 लाख) आकारले.
तांत्रिक चुकीने असा प्रकार घडला
त्यानंतर कॅफे चालकाने झाला प्रकार मानवी चुकीने झाल्याचा दावा केला. ज्यावेळी त्यांनी त्यांच्या खात्यातले सर्व पैसे संपलेत आम्हाला कापलेले पैसे परत द्या असे सांगितले असता. त्या कॉफी चेनच्या जिल्हा व्यवस्थापकाने आपले नेटवर्क खराब असल्याने ही रक्कम दोन चेकद्वारे देतो असे सांगितले. या कपलचे दुर्दैव येथेच संपले नाही तर हे दिलेले दोन्ही चेकही न वटता परत आले. कारण टायपिंगच्या एररने त्यांचे दोन्ही चेक बाऊन्स झाल्याचा मॅसेज त्यांना आला. या प्रकरणी त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यावेळी मग त्यानंतर त्यांना नव्याने दोन चेक देण्यात आले. स्टारबक्स हे महागड्या कॉफीसाठी ओळखले जाते.
गेल्यावर्षी या चेनने आपला मेन्यू चेंज करीत मसाला चाय आणि फिल्टर कॉफी असे पदार्थ समाविष्ठ केल्याने भारतीय कस्टमरांचे लक्ष वळले आहे. अलिकडेच त्यांनी फिल्टर कॉफीची जाहीरात करताना आजीच्या चवीची फिल्टर कॉफी 290 रूपयांना प्या अशी जाहीरातही गाजली होती.