VIDEO | दिल्ली मेट्रोमध्ये जोडप्याच्या ‘त्या’ कृत्याने काकू चिडल्या, जोरदार वादावादी, व्हिडिओ व्हायरल
VIRAL VIDEO | सध्या जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये काकू आणि एका कपलमध्ये जोराचं भांडणं झालं आहे. त्या काकूंनी त्या जोडप्याला बरचं काही सुनावलं आहे.
मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (VIRAL VIDEO) झाला आहे. तो व्हिडीओ दिल्ली मेट्रोमधील (DELHI METRO) आहे. कधी दिल्ली मेट्रोमध्ये कपल किस करीत आहे. तर कधी रिल्स तयार करीत आहे. व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी तरुण आणि तरुणी तिथं काहीही करीत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल सुध्दा झाले आहेत. दिल्ली मेट्रोमधील रोज नव्या घटना व्हिडीओच्या (TRENDING VIDEO) माध्यमातून उघडकीस आल्या आहेत. आता त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्याचा व्हिडीओ सुध्दा दिल्लीचा असून त्यामध्ये एका कपलचं आणि काकूचं जोरदार भांडणं झालं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, मेट्रोमध्ये दोन काकू बसल्या आहेत. त्यांच्यात आणि एका कपलमध्ये जाम वादावादी झाली आहे. काकू म्हणत आहेत की, ‘तुम्ही लोकं थोडीशी लाज बाळगा, असं करायला नाही पाहिजे’. त्यावर तो मुलगा म्हणत आहे की, ‘आम्ही का लाज बाळगायची…तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या…’ बाकीचं जे काही आहे ते तुम्ही व्हिडीओत पाहा.
Kalesh B/w Aunties and a Couple inside Delhi Metro( Aunty didn’t like the way they are standing inside Metro) pic.twitter.com/uOXc29m3Y5
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 26, 2023
या व्हिडीओला ट्विटरवरती @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ 26 जूनचा असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. व्हिडीओ सोबत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, दिल्ली मेट्रोमध्ये दोन काकू आणि कपल यांच्यात जोराची वादावादी झाली. त्या दोन काकूंना कपलची उभं राहण्याची पद्धत अजिबात आवडली नाही. हा व्हिडीओ ३ लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा कमेंट करा. काही लोकांचं असं म्हणणं आहे की, ‘ज्यावेळी आम्ही मेट्रोने प्रवास करतो. त्यावेळी असा प्रकार का नसतो.’ काही लोकांनी त्या जोडप्याला सपोर्ट केला आहे. ‘प्रेम केलंय तर घाबरायचं काय,’ या व्हिडीओच्या बाबत तुमचं मत काय आहे ? आम्हाला कमेंट करुन कळवा.