VIDEO : मगरीने केला हल्ला, पण गाईने अशी मिळवली मगरमिठीतून सुटका
मगरीने गाईवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर एका युजरने शेअर केला. व्हिडिओ पोस्ट करून काही तास उलटत नाहीत तोच व्हिडिओला लाईक आणि कमेंट्सचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
कुणी एखाद्या गोष्टीवर घट्ट पकड धरली तर त्याला मगरमिठी असे म्हटले जाते. यावरूनच मगरमिठी या शब्दातील ताकद लक्षात येते. एकदा का मगरीच्या तावडीत कोणी सापडले की त्याची सुटका झाली नाही असेच समजले जाते. मगरीचा विळखा हा फार भयानक मानला जातो. त्यामुळे पाण्यामध्ये दूर अंतरावर जरी मगर दिसली तरी अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. याच मगरीचा थरारक अनुभव देणारा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.
मगरीच्या तावडीमध्ये एक गाय सापडली आहे. मगर आता तिला ठार करणार की काय अशी भीती प्रत्येकाला वाटते. पण काही क्षणांतच गाय झटका देते आणि मगर मिठीतून स्वतःची सुटका करून घेते. हा गायीचा संघर्ष पाहणे अधिक रंजक ठरत आहे.
शांत गाईने आक्रमक मगरीला दिला झटका
प्राण्यांच्या विश्वात मगरीला धोकादायक प्राणी मानले जाते. मगर पाण्याच्या तळाशी दबा धरून बसलेली असते. ज्यावेळी जंगली किंवा अन्य कुठलाही प्राणी पाण्याच्या प्रवाहाशेजारी येतो, त्यावेळी दबा धरून बसलेली मगर अचानक त्या प्राण्यांवर हल्ला करते.
मगरीच्या याच हल्लेखोर वृत्तीची सर्वच प्राण्यांमध्ये प्रचंड दहशत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये देखील मगरीची प्रचंड दहशत दिसून येत आहे. मगरीने गायीच्या पाठीमागील भागाला भयानक दंश केला आहे. तिच्या जबड्यातून सुटका करून घेण्यासाठी गाय देखील शर्थीचे प्रयत्न करीत आहे.
अखेर या संघर्षात मगरला हरवण्याचा पराक्रम गाईने केला आहे. गाय ही खरंतर शांत प्राणी म्हणून ओळखले जाते. तिने आक्रमक मानल्या जाणाऱ्या मगरीला दिलेला झटका सोशल मीडियामध्ये कौतुकाचा विषय ठरला आहे. त्यामुळेच गाय आणि मगरीच्या संघर्षाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
इंस्टाग्रामवर व्हिडिओला मोठा प्रतिसाद
मगरीने गाईवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर एका युजरने शेअर केला. व्हिडिओ पोस्ट करून काही तास उलटत नाहीत तोच व्हिडिओला लाईक आणि कमेंट्सचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.