GoogleMapsच्या आधी ‘असे’ शोधले जायचे रस्ते, Funny video पाहून म्हणाल, क्या टायमिंग है!

Cow funny video : सध्या सोशल मीडियावर (Social media) एका गायीचा (Cow) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये ती मजेदार पद्धतीने लोकांना पत्ता सांगताना दिसत आहे. काही लोक गायीला पत्ता विचारत आहेत आणि ती तो सांगत आहे.

GoogleMapsच्या आधी 'असे' शोधले जायचे रस्ते, Funny video पाहून म्हणाल, क्या टायमिंग है!
पत्ता विचारताना गाय मानेने इशारा करतेImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 12:52 PM

Cow funny video : प्राणी तर मुके असतात, त्यांना माणसांची भाषा कुठे कळते? असे लोक म्हणतात. मात्र, कुत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर असे दिसून येते, की त्यांना माणसांची भाषा बोलता येत नसली तरी त्यांना योग्य प्रशिक्षण दिले गेले तर त्यांना समजते. तुम्ही पाहिलेच असेल, की जे लोक कुत्रे पाळतात, त्यांना खूप काही शिकवतात, जसे की कुठे उठायचे, कुठे झोपायचे, काय करावे, काय करू नये वगैरे… कुत्रेही त्यांची आज्ञा पाळतात आणि मालक जे काही सांगतात ते पूर्ण ऐकतात. जर आपण गायी आणि म्हशींबद्दल बोललो तर त्यांना माणसाची भाषा अजिबात समजत नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर (Social media) एका गायीचा (Cow) एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये गाय मजेदार पद्धतीने लोकांना पत्ता सांगताना दिसत आहे. काही लोक गायीला पत्ता विचारत आहेत आणि ती तो सांगत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हसू आल्याशिवाय राहत नाही.

अचूक टायमिंग

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की काही लोक कारमधून कुठेतरी जात आहेत आणि ते वाटेत थांबतात आणि एका गायीला पत्ता विचारतात. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे गायही त्यांना पाहून थांबते. जेव्हा गाडीत बसलेल्या व्यक्तीने गायीकडून बोलोनियाचा पत्ता विचारला, तेव्हा गाय डोके हलवून सांगते, की ते पुढे आहे, त्यानंतर ते लोक हसतात आणि पुढे जातात. खरे तर गाय त्यांना पत्ता सांगत नाही, उलट ती नुसतेच डोके हलवते, पण ती ज्या टायमिंगने डोके हलवते, त्यावरून ती पत्ता सांगत असल्याचे जाणवते.

ट्विटर हँडलवर शेअर

हा एक अतिशय मजेशीर व्हिडिओ आहे, जो IPS अधिकारी दिपांशू काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि विनोदी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘Google Mapsच्या आधी असे शोधले जायचे रस्ते’. अवघ्या 9 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

आणखी वाचा :

…म्हणून म्हणतात आगीशी कधीही खेळू नये, ‘या’ माणसाची कशी अवस्था झाली? पाहा ‘हा’ Viral video

Viral : 11 वर्षाच्या मुलानं परदेशात खरेदी केली जमीन, कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल; वाचा सविस्तर

Photo : ‘…तर मला विमानातून फेकून द्या’, वडा पावच्या फोटोची ‘ही’ पोस्ट होतेय Viral

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.