Balloon craft : अशी Creativity वापरून तुम्हीही बनवू शकता टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, Video viral
Creative craft video : क्रिएटिव्हिटीचे (Creativity) अनेक नमुने आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे. फुग्यापासून एक अनोखी वस्तू त्याने तयार केलीय. यूझर्सही हा व्हिडिओ पाहून टाकाऊपासून टिकाऊचा धडा घेत आहेत.
Creative craft video : क्रिएटिव्हिटी (Creativity) आणि त्यासंबंधीचे अनेक नमुने आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. एखाद्या टाकाऊ वस्तूपासून उपयुक्त अशी वस्तू तयार करण्याची कला सर्वांनाच अवगत असते असे नाही. आपल्या घरात कितीतरी वस्तू असतात, ज्या आपण काही दिवस वापरून फेकून देतो. कधी कधी तर चांगल्या असलेल्या वस्तूचीही आपण विनाकारण विल्हेवाट लावून टाकतो. मात्र वस्तूचा दुहेरी उपयोग करता यायला हवा. काही क्रिएटिव्ह डोकेबाज मंडळी यात फारच निपूण असतात. ते अशी काही क्रिएटिव्हिटी करतात, की वस्तू नव्यासारखी वाटते, शिवाय वेगळीही… असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे. फुग्यापासून एक अनोखी वस्तू त्याने तयार केलीय. यूझर्सही हा व्हिडिओ पाहून टाकाऊपासून टिकाऊचा धडा घेत आहेत.
फुग्यापासून कलाकृती
व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक फुगा दिसत आहे. काही प्लास्टिकचे चमचेही समोर ठेवलेले आहेत. तो त्या फुग्याला फुगवतो. नंतर डिंकाने (Gum) त्यावर काही कागदाचे तुकडे चिकटवतो. ते व्यवस्थित वाळल्यानंतर फुग्याचा दोरा काढून टाकतो. तसेच वरच्या बाजूने त्याला गोलाकार कापतो. आता प्लास्टिकच्या चमच्यांना तो त्या फुग्यावर व्यवस्थित चिकटवतो. त्यानंतर फुग्याला रंग देतो आणि तयार करतो एक सुंदर कलाकृती…
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर आरबी क्रिएटिव्ह वर्ल्ड (RB creative world) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 11 मार्चला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून ‘Balloon Craft’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. यूझर्सना ही क्रिएटिव्हिटी आवडली असून व्हिडिओवर कमेंट्स येत आहेत. 311,905+ व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत.