Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आणि अशाप्रकारे कावळ्यानं वाचवला उंदराचा जीव! लोक म्हणतायत, मैत्री असावी तर अशी…

Amazing video : एक आश्चर्यकारक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक कावळा उंदराचा जीव वाचवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, की रस्त्यावरून वाहने येत-जात आहेत आणि यादरम्यान एक छोटा उंदीर रस्ता ओलांडत आहे.

...आणि अशाप्रकारे कावळ्यानं वाचवला उंदराचा जीव! लोक म्हणतायत, मैत्री असावी तर अशी...
शेपटीला पकडून उंदराला वाचवतो कावळाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 2:53 PM

Amazing video : सोशल मीडियाच्या या युगात आपल्यापासून काहीही लपत नाही. आपण सर्वकाही पाहत आहोत. काहीही घडले, कोणतीही घटना घडली तर त्याचा व्हिडिओ जगभरातील लोकांपर्यंत पोहोचतो आणि हे सर्व सोशल मीडियामुळे शक्य झाले आहे. एक काळ असा होता की माणसे, प्राणी, पक्षी यांच्याविषयी फारशी माहिती मिळवू शकत नव्हते. ते काय करतात, काय करत नाहीत इ. पण आता फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब इत्यादी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यापैकी काही लोकांना हसतात आणि काही विचार करायला लावतात, काही आश्चर्यचकितदेखील करतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक कावळा उंदराचा जीव वाचवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, की रस्त्यावरून वाहने येत-जात आहेत आणि यादरम्यान एक छोटा उंदीर रस्ता ओलांडत आहे.

कावळ्याचे शहाणपण

उंदराच्या समोरून एक कार जाताच एक कावळा त्याची शेपटी पकडून मागे खेचतो. आता त्या कावळ्याला इतके शहाणपण आले आहे, की उंदराने रस्त्यावर चालूच नये, नाहीतर मरूही शकतो. उंदराला हे समजले नाही आणि तो निर्भयपणे पुढे जात होता, पण कावळ्याने त्याचा जीव वाचवला. कावळ्यांची ही समज लोकांच्या मनाला भिडली आहे.

ट्विटर हँडलवर शेअर

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अतिशय मजेशीर गोष्ट लिहिली आहे. ‘जो तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतो, तोच तुमचा खरा मित्र’ असे त्यांनी लिहिले आहे. मित्र चुकीच्या मार्गावर चालत असेल तर त्याला पटवून देणारा आणि त्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखणारा मित्र असला पाहिजे हे अगदी खरे आहे.

‘किती सुंदर दृश्य आहे हे’

12 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 36 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की किती सुंदर दृश्य आहे हे, तर इतर यूझर्सनीही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा :

‘शांतपणे उभा होता ना बैल, काठीनं मारण्याची काय गरज होती?’ कसा शिकवला आजोबांना धडा? पाहा Viral video

मगरीला मिठी मारल्यानंतर लोक म्हणतायत, माणसाने अशा क्रूर प्राण्यांपासून दूर राहायला हवे! Video viral

प्रेमाला कोणतंही बंधन नसतं, हेच खरं! आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी किती अतूर झाला हत्ती? पाहा Viral video

तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ
शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शाह रोपवेनं किल्ले रायगडावर, बघा व्हिडीओ.
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड
...म्हणून पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, तिसऱ्या अहवालातून मोठी माहिती उघड.
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
शाह रायगड दौऱ्यावर, तटकरेंकडे स्नेहभोजन; पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?.
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं
'खबर पता चली क्या?',राऊतांकडून बकऱ्याचा फोटो ट्वीट अन् शिंदेंना डिवचलं.