Amazing video : सोशल मीडियाच्या या युगात आपल्यापासून काहीही लपत नाही. आपण सर्वकाही पाहत आहोत. काहीही घडले, कोणतीही घटना घडली तर त्याचा व्हिडिओ जगभरातील लोकांपर्यंत पोहोचतो आणि हे सर्व सोशल मीडियामुळे शक्य झाले आहे. एक काळ असा होता की माणसे, प्राणी, पक्षी यांच्याविषयी फारशी माहिती मिळवू शकत नव्हते. ते काय करतात, काय करत नाहीत इ. पण आता फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब इत्यादी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यापैकी काही लोकांना हसतात आणि काही विचार करायला लावतात, काही आश्चर्यचकितदेखील करतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक कावळा उंदराचा जीव वाचवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, की रस्त्यावरून वाहने येत-जात आहेत आणि यादरम्यान एक छोटा उंदीर रस्ता ओलांडत आहे.
उंदराच्या समोरून एक कार जाताच एक कावळा त्याची शेपटी पकडून मागे खेचतो. आता त्या कावळ्याला इतके शहाणपण आले आहे, की उंदराने रस्त्यावर चालूच नये, नाहीतर मरूही शकतो. उंदराला हे समजले नाही आणि तो निर्भयपणे पुढे जात होता, पण कावळ्याने त्याचा जीव वाचवला. कावळ्यांची ही समज लोकांच्या मनाला भिडली आहे.
जो गलत रास्ते पर जाने से रोके,
वही आपका सच्चा साथी है. pic.twitter.com/VdNq83BlCh— Dipanshu Kabra (@ipskabra) March 16, 2022
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अतिशय मजेशीर गोष्ट लिहिली आहे. ‘जो तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतो, तोच तुमचा खरा मित्र’ असे त्यांनी लिहिले आहे. मित्र चुकीच्या मार्गावर चालत असेल तर त्याला पटवून देणारा आणि त्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखणारा मित्र असला पाहिजे हे अगदी खरे आहे.
12 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 36 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की किती सुंदर दृश्य आहे हे, तर इतर यूझर्सनीही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.