जेव्हा जेव्हा तुम्हाला नोकरी (Job) सोडायची असते, एखाद्या चांगल्या कंपनीकडून तुम्हाला ऑफर येते तेव्हा तुम्ही अर्थातच नोकरी सोडायची तयारी सुरु करता. मग रेसिग्नेशन (Resignation Letter) कसं लिहायचं, त्यात नेमकं काय लिहायचं हा विचार सुरु होतो. प्रसंगी या गोष्टी गुगल केल्या जातात. लोकांचं रेसिग्नेशन म्हणजे सर्वस्व असतं. इतके वर्ष/ दिवस काम केलेल्या ठिकाणाला तुम्ही टाटा बाय बाय कसं करता याला फार महत्त्व असतं. या एका लेटरमुळे तुम्ही कायमचे लक्षात राहू शकता.काही लोकांना ह्यातलं काहीच पडलेलं नसतं. ते मनाला वाट्टेल ते त्या रेसिग्नेशन लेटरमध्ये लिहीतात आणि मग ते लेटर वायरल होतं. सध्या सोशल मीडियावर एक रेसिग्नेशनचा फोटो वायरल (Photo Viral) होत आहे, जो अत्यंत साधा आणि छोटा आहे. हे लेटर आपण वाचायला सुरुवात करताच लगेच संपेल, कारण ते अगदी छोटंसं आहे आणि हो खूप विनोदी देखील आहे.
इंटरनेटवर एका रेसिग्नेशन लेटरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे एक छोटंसं आणि धक्कादायक पत्र आहे, या राजीनाम्यामुळे इंटरनेट चांगलेच खुश झाले असून प्रत्येकजण त्यावर आपला अभिप्राय देत आहे. अर्थात, या राजीनाम्याचा ( रेसिग्नेशन लेटर) फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. ट्विटरवर युजर्स राजीनाम्याचे अनेक फोटो शेअर करत आहेत. हा फोटो एका कावेरी नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शॉर्ट अँड स्वीट”.
Short and sweet. pic.twitter.com/KYXYgeq2tl
— Kaveri ?? (@ikaveri) June 14, 2022
या कर्मचाऱ्याने आपल्या रेसिग्नेशन लेटरमध्ये लिहीलं आहे, ‘प्रिय सर, विषय : राजीनामा, बाय बाय सर.’ असं लिहीत त्याने स्वत: या लेटरवर सही केलीये. या वायरल राजीनाम्याबाबत नेटकऱ्यांनी आपली मतं मांडलीयेत. काही युजर्सनी हे रेसिग्नेशन लेटर पाहून त्यांचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले. एका युझरने लिहिले की, “गेल्या आठवड्यात मला राजीनामा मिळाला, जो आणखी लहान होता. ज्या दिवशी त्याला पगाराचा धनादेश मिळाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने हा राजीनामा मला व्हॉट्सॲपवर मिळाला होता.”
I got one last week, which was even shorter. It was on WhatsApp, the day after he got his pay cheque pic.twitter.com/XBFh2onb6l
— Shamit Manchanda (@shamit) June 14, 2022
— I hate you but still I (@SaifulBariAMU) June 14, 2022