मुंबईः सायरस मिस्री (cyrus mistry) यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या आप्तस्वकियांकडून त्यांच्या आठवणीना उजाळा देण्यात येत असला तरी सायरस मिस्त्रींबरोबर घालवलेली अनेक माणसं त्यांच्या विनम्रतेबद्दल आता सांगू लागली आहेत. एका प्रवासात रस्त्यावरील एका ढाब्यावर आपल्या ड्रायव्हरबरोबर (Driver) जेवत असतानाचा त्यांचा फोटो प्रचंड व्हायरल (Photo Viral) झाला आहे. सोशल मीडियावर सायरस मिस्रींविषयी जी पोस्ट करण्यात आली आहे, त्यामध्ये साधे कपडे घालून ड्रायव्हर सोबत एकाच कॉटवर पारंपरिक पद्धतीने जेवताना ते फोटोत दिसत आहेत.कॅमेऱ्याकडे बघून ते दिलखुलासपणे हसतानाचा हा फोटो आता अनेक जणांनी शेअर केला आहे.
कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्री यांचे निधन झाले, त्यानंतर सायरस मिस्री यांचा ड्रायव्हर सोबत जेवण करतानाचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी तो शेअर केला आहे.
हैदराबादमधील झोरोस्ट्रिअन्स फेसबुक पेजवरुन सायरस मिस्त्रींचा स्थानिक ढाब्यावर जेवणाचा आनंद घेत असतानाचा फोटो शेअर केला आहे. तर शापूरजी पालोनेजी ग्रुपने त्यांना आदरांजली वाहताना म्हटले आहे की, भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबांपैकी एक असलेले आणि 54 वर्षांच्या या व्यक्तीच्या मृत्यूमुळे भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे, त्याबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.
तर एका पेजवरुन त्यांच्या साधेपणाचा उल्लेख करत एक फोटो हजार शब्दांपेक्षा खूप काही बोलून जातो असं म्हटले आहे. फोटोत दिसणारी सायरस मिस्त्री यांची विनम्रता बघा, एका रस्त्यावरच्या ढाब्यावर आपल्या ड्रायव्हरसोबत साधेपणाने ते जेवण करताना दिसत आहेत.
सायरस मिस्रींनी विमान प्रवासपेक्षा कार आणि स्ट्रीट फूडला त्यांनी प्राधान्य दिले होते. या फोटोविषयी काही जणांनी सांगितले आहे की, हा फोटो 2016 मधील आहे.