Food challenge video : कमी किंवा ठराविक वेळेत एकादी गोष्ट करण्याची संकल्पना काही वेगळीच आहे. प्रत्येकाला असे चॅलेंज घ्यायला आवडत असते. काही लोक कमी वेळेत खाण्याचे चॅलेंज घेतात, तर काही लोक कमी वेळेत काहीतरी बनवण्याचे चॅलेंज स्वीकारतात. हे सर्व करताना सर्वांचीच मजा होते. खाणाऱ्यांची तारांबळ होते. पण एक फायदा असतो. खायलाही मिळते आणि सहभाग घेतला किंवा जिंकलो तर पैसेही मिळतात. तर बनवणाऱ्यांसमोरही अशाच प्रकारचे चॅलेंज असते. त्यांनाही पैसे मिळतात. सोशल मीडियावर असे व्हिडिओ आपण पाहत असतो. आता असाच एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. दिलेल्या वेळेत रस्त्यावरील विक्रेत्याला एक पदार्थ बनवायचा आहे. रस्त्यावरील ज्या विक्रेत्याला हे चॅलेंज दिले ते त्याने कसे पूर्ण केले, हे पाहणे मनोरंजक आहे.
व्हिडिओमध्ये एक रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारा विक्रेता दिसत आहे. चॅलेंज देणारा त्याला म्हणतो, की 30 सेकंदांत त्याला दही वडा (दही भल्ला) बनवायचा आहे. विक्रेता स्वत: सांगतो की तो इतक्या कमी वेळेत आपले चॅलेंज पूर्ण करेल. मग वेळ सुरू होते आणि तो एक एक पदार्थ टाकून दही वडा तयार करतो. विशेष म्हणजे त्याने सांगितलेल्या 30 सेकंदांच्या वेळेत तो आपले चॅलेंज पूर्णही करतो. व्हिडिओ पाहा…
खाद्यपदार्थांचा हा व्हिडिओ यूट्यूबवर फूडी विशाल (FOODY VISHAL) या चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे. 21 मार्चला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. ‘dahi bhalle challenge‘ असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हिडिओचे लाइक्स आणि कमेंट्स सातत्याने वाढत आहेत.