गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक, काहीजण साउंडवर चढले, हरियाणवी क्वीनचा डान्स पाहिला का?
तेरी आख्या का यो काजल गाण्यावर हरियाणा क्वीनचे ठुमके, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Sapna Choudhary: महाराष्ट्रात गौतमी पाटील आणि हरियाणामध्ये डान्सर क्वीन अभिनेत्री सपना चौधरीच्या डान्सने धुमाकूळ घातला आहे. सपना चौधरीच्या डान्स स्टेपचे व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांना आकर्षित करत आहेत. मोठ्या प्रमाणात सपना चौधरीच्या डान्स कार्यक्रमाना चाहत्यांची गर्दी असते. सपना चौधरीचा डान्स म्हटलं की तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला हजेरी लावतो.
व्हिडीओमध्ये काय?
हरियाणामधील सपना चौधरी तिच्या डान्स आणि ठुमके यामुळे खूप चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर सपनाचा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सपनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी जमलेली दिसत आहे. काही जण हॉलमधील पोलवर तर काही जण सपनाचा डान्स पाहण्यासाठी साउंडवर चढले आहेत. या व्हिडीओमध्ये सपना चौधरीसोबत एक मुलगी तिच्या स्टेप बरोबर डान्स करत आहे. सपनाचा हा व्हिडीओ आता पर्यंत 3 मिलियन लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात कमेंट्स आणि शेअर देखील करण्यात आलं आहे.
सपना चौधरी तिच्या डान्स सोबत एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. हरियाणा तसेच महाराष्ट्रात देखील सपना चौधरीचे लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सपना तिच्या चाहत्यांना सतत रील्स आणि फोटो शेअर करत असते