Viral : ‘हा’ प्राणी नेमका आहे तरी कसा? Photo पाहून विचाराच पडले यूझर्स
Weird Animals : सोशल मीडियावर कधीकधी काहीतरी विचित्र असे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. टायटस डॉग (Titus the dog) पाहा, जो विचित्र दिसतो. पिटबुल डॉगबद्दल (Pitbull) तुम्ही ऐकलेच असेल, तो किती भयानक (Dangerous) आहे. यासंबंधीचा फोटो व्हायरल झालाय.
Weird Animals : सोशल मीडियावर कधीकधी काहीतरी विचित्र असे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही प्राणी अतिशय विचित्र असतात आणि इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात, यात शंका नाही. इतरांपेक्षा वेगळे असल्याने त्यांचे फोटो आणि व्हिडिओ वेगात व्हायरल होत असतात. कुत्रा (Dog) हा प्राणीही असा आहे, की त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. उदाहरणार्थ, टायटस डॉग (Titus the dog) पाहा, जो विचित्र दिसतो. पिटबुल डॉगबद्दल (Pitbull) तुम्ही ऐकलेच असेल, तो किती भयानक (Dangerous) आहे, तो टायटस डॉगसारखा दिसतो. पहिल्या दृष्टीक्षेपात, तुम्हाला वाटेल की टायटस खरोखर एक चित्त्यासारखा आहे, परंतु तो प्रत्यक्षात एक कुत्रा आहे. मात्र, या टायटस डॉगबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कुत्र्याच्या मालकाने रेडिट या सोशल मीडिया साइटवर टायटसचा एक फोटो पोस्ट केला, जिथे त्याला 7000पेक्षा जास्त ‘थम्सअप’ मिळाले आणि हा टायटस त्याच्या अनोख्या लूकमुळे व्हायरल झाला.
लोकांना वाटत नाही खरे
चित्त्यासारखा दिसणारा हा कुत्रा अनेकांना आकर्षित करत असला, तरी यावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याची बरीच कारणे आहेत, कारण त्या व्यक्तीने फक्त एक फोटो ऑनलाइन पोस्ट केला आहे. टायटससुद्धा असा दिसत होता, की तो एका ग्रूमर्सच्या सलूनमध्ये बसला आहे. इतकंच नाही तर कुत्र्यावर शाईचे डाग टाकून पेंटिंग केल्याप्रमाणे ते दिसत होते. लोक तरी असाच अंदाज लावत होते. त्या व्यक्तीने असेही सांगितले, की टायटस हा अल्बेनियन पिट बुल आहे, परंतु त्या कुत्र्याची जात आता अस्तित्वात नाही.
Titus has the rarest markings for a pit. Very cool. #pitbull #dogsoftwitter #dogstyle #fff #dogsarelove #doglovers pic.twitter.com/QuKD0k55Qo
— Russell Scott⭐ (@FotosGab) February 29, 2020
जगातील दुर्मीळ पिट बुल
सायन्स क्लब या न्यूज वेबसाइटनुसार, या कुत्र्याचे खरे नाव टायटस असून तो शिकारी नाही. तो जगातील दुर्मीळ पिट बुल कुत्रा आहे आणि असे म्हटले जाते, की तो पृथ्वीवर एकमेव आहे. या जातीचा अर्थ इतर कुत्र्यांपेक्षा खूप वेगळा आहे, कारण तो चित्त्यासारखा दिसतो. त्याचे सौंदर्य वेगळेच आहे. तज्ज्ञांचे असे मत आहे, की असे उत्परिवर्तन नैसर्गिक मानले जाऊ शकत नाही. ते तयार करण्याचे अनेक मार्ग आहेत.
— Amazing Physics (@amazing_physics) February 24, 2022