Video | क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर बनला रजिनकांत, केला ऐश्वर्या रायसोबत धमाकेदार डान्स

| Updated on: Aug 30, 2021 | 11:26 PM

सोशल मीडियार डेव्हिड वॉर्नर हा क्रिकेटपटू चांगलाच सक्रिय आहे. सध्या त्याने एक मजेशीर व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क ऐश्वर्या रायसोबत डान्स करताना दिसत आहे.

Video | क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर बनला रजिनकांत, केला ऐश्वर्या रायसोबत धमाकेदार डान्स
david warner
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या एका क्रिकेटपटूचा मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये डेव्हिड वॉर्नर चक्क ऐश्वर्या रायसोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. (david warner replace himself with rajinikanth dancing with aishwarya rai video went viral on social media)

ऐश्वर्यासोबत डेव्हिड वॉर्नर डान्स करतोय

सोशल मीडियार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर चांगलाच सक्रिय आहे. सध्या त्याने एक मजेशीर व्हिडीओ अपलोड केलाय. या व्हिडीओमध्ये तो चक्क ऐश्वर्या रायसोबत डान्स करताना दिसत आहे. रजनिकांत ऐवजी ऐश्वर्यासोबत डेव्हिड वॉर्नर डान्स करत आहे.

फेस अ‌ॅपचा वापर करुन व्हिडीओ एडिट केला

फेस अ‌ॅपचा वापर करुन हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर अपलोड करताच व्हायरल झाला आहे. या मूळच्या व्हिडीओमध्ये सुपरस्टार रजनिकांत आणि ऐश्वर्या राय गाण्यावर डान्स करताना दाखवण्यात आल्या आहेत. मात्र, फेस अ‌ॅपचा वापर करुन डेव्हिडने रजनिकांतच्या चेहऱ्यावर स्वत:चा चेहरा बसवला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी खूश झाले असून, लाखो नेटकऱ्यांनी त्याला लाईक केले आहे. काही नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअरसुद्धा केले आहे. या व्हिडीओवरील कमेंट्स वाचण्यासारख्या आहेत.

इतर बातम्या :

Video | चिमुकली राधा कृष्णावर रुसली, मजेदार डान्स सोशल मीडियावर व्हायरल

IAS अधिकाऱ्यावर भाज्या विकण्याची वेळ, सगळं सोडून रस्त्यावर बसला, ‘त्या’ एका फोटोमुळे चर्चांना उधाण

Video | उंच डोंगरावर कुत्र्याची मस्ती, एका चुकीमुळे मालकाला फुटला घाम, नेमकं काय घडलं ?