Deer video viral : जीव वाचवण्यासाठी हरिणांनी लढवली अनोखी शक्कल, रिकाम्या पोटी जंगली कुत्र्यांना फिरावं लागलं परत!
Wild animal video : जंगलात विविध प्रकारचे प्राणी आढळतात, त्यापैकी काही अतिशय धोकादायक (Dangerous)असतात तर काही प्राणी शांत स्वभावाचे असतात. सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो जंगली कुत्र्यांचा आणि हरणांचा आहे.
Wild animal video : जंगलात विविध प्रकारचे प्राणी आढळतात, त्यापैकी काही अतिशय धोकादायक (Dangerous)असतात तर काही प्राणी शांत स्वभावाचे असतात. हरणासारखे प्राणी शांत स्वभावाचे असतात, तर सिंह, वाघ, बिबट्या इत्यादी धोकादायक प्राण्यांच्या श्रेणीत येतात, ज्यापासून मानवाला तसेच जंगलात राहणार्या लहान प्राण्यांना दूर राहावे लागते, अन्यथा ते क्षणार्धात कोणाचाही फडशा पाडू शकतात. त्यांना फाडून खाऊ शकतात. या बाबतीत जंगली कुत्रेही कमी नाहीत. ते त्यांची शिकारही क्षणार्धात पकडून त्यांना मारून खातात. यामुळे प्राणी त्यांना पाहताच पळून जातात. सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो जंगली कुत्र्यांचा आणि हरणांचा आहे, ज्यामध्ये हरणांनी जंगली कुत्र्यांपासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.
हरीण जागेवरून हलतही नाही…
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका उंच दगडाच्या अगदी काठावर तीन हरणे लपून बसली आहेत, तर खालपासून वरपर्यंत जंगली कुत्र्यांचा कळप जेव्हा त्यांची शिकार करण्यासाठी खाली येतो तेव्हा ते हरीण जागेवरून हलत नाही. शेवटी, प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. एक-दोन जंगली कुत्रे किनाऱ्यावर जाऊन हरणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पण ते अयशस्वी राहतात. जंगली कुत्रे बराच वेळ तिथे डोळे लावून बसतात, पण त्यांची शिकार दगडावरून खाली उतरण्याचे नाव घेत नाही.
ट्विटर हँडलवर शेअर
हा व्हिडिओ IFS अधिकारी सुसांता नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की Balancing life… Keeping calm at the face of death. 41 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 30 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले, ‘खरंच! धैर्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे’, तर दुसर्या यूझरने लिहिले आहे, की हा व्हिडिओ खूपच थरारक आहे.
Balancing life… Keeping calm at the face of death.
?MalaMala Game Reserve pic.twitter.com/NctUAywQRW
— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 23, 2022