Viral Video: जिंकलंस भावा, सिंहाच्या तावडीतून असा सुटला की, थेट सिंह थेट तोंडावर आपटला!

सिहिंण दबक्या पावलाने हरणाच्या जवळ जाते, आणि अखेर तो क्षण येतो, जेव्हा सगळं संपणार असतं. सिहिंण जिंकणार असते. सिंहिण हरणावर झडप घालते, पण...

Viral Video: जिंकलंस भावा, सिंहाच्या तावडीतून असा सुटला की, थेट सिंह थेट तोंडावर आपटला!
सिंहिणीने घात घातला, हरणाने पळ काढला, पण...
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 12:45 PM

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं अनेकदा म्हटलं जातं, मात्र याचा प्रत्येक फार कमीवेळा पाहायला मिळतो. याचाच प्रत्येय देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे एका शिकारीचा…सिहिंणकडून (Lion) करण्यात आलेल्या हरणाच्या (Deer) शिकारीच्या प्रयत्नाचा. जंगलाचे नियम फार कडक असतात, एकदा जरी नजर चुकली की घात होतो. अन्नसाखळीत वर असणारा प्रत्येक प्राणी खालच्या प्राण्याला अन्न मानतो, आणि त्याची शिकार करतो. शिकार आणि शिकारी यांच्यातील नातं सांगणारा सिंहाच्या शिकारीचा हा व्हिडीओ पाहण्यासारखा आहे.

या व्हिडीओत एक सिंहिण दगा धरुन बसलेली दिसत आहे. तिच्या समोर एक हरण चरताना दिसत आहे. हे गवताळ कुरण सुकलेलं असल्याने सिहिंणीचा रंगही त्याच समावला जातोय,त्यामुळे हरणाच्या अगदी जवळ घात लावून बसलेली असतानाही ती दिसत नाही. हरणाला याची थोडीही कल्पना नाही, की काहीच वेळात त्याच्यावर मोठं संकट कोसळणार आहे.

सिहिंण दबक्या पावलाने हरणाच्या जवळ जाते, आणि अखेर तो क्षण येतो, जेव्हा सगळं संपणार असतं. सिहिंण जिंकणार असते. सिंहिण हरणावर झडप घालते, पण काही सेकंदात हे हरिण सावध होतं, आणि त्याची चतुराईही क्षणात दिसते. सिहिंणीच्या झडपेसोबतच हरिण डाव्या बाजूला पळायला लागते, सिहिंणही तिथेच जाते, पण हरिण क्षणांत दिशा बदलतं, आणि सिहिंणीला चकमा देतं.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ पाहा:

हरणाच्या या चतुराईचं नेटकऱ्यांनी जाम कौतुक केलं आहे. हरणासारखी चतुराई प्रत्येकाने आपल्या आयुष्यात दाखवली, तर संकटं तोंडावर पडतील असं एका नेटकऱ्याचं म्हणणं आहे. तर एकाने म्हटलंय की, या व्हिडीओने मला प्रचंड आशावाद दिलाय, जीवनात संकटावर मात करुन पुढे जाता येतं, फक्त संकटातही आपण आपली बुद्धी चालवली पाहिजे.

आफ्रिकेतील मसाईमाराच्या जंगलातील हा व्हिडीओ आहे. हे जगातील सर्वात मोठ्या गवताळ कुरणांपैकी एक आहे, जिथे जगातील सर्वाधिक जंगली प्राण्यांचं अस्तित्व आढळतं. हा भाग जंगली प्राण्यांसाठी संवर्धित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.