मुंबई : आपण बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी प्रसूती (Women delivery) झाल्याचं ऐकलं आहे. अनेकदा ट्रेनमध्ये, विमानात बसमध्ये गरोदर महिलांची प्रसूती झाल्याचं समोर येतं आता मेट्रोत महिलेची प्रसूती झाल्याचं समोर आलं आहे.दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनवर महिलेची प्रसूती झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील आनंद विहार मेट्रो स्टेशनवर (delhi anand vihar metro station) एका 22 वर्षीय महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर मेट्रोची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या. ही घटना गुरूवारी दुपारी 3.25 च्या सुमारास घडली. त्यानंतर त्या महिलेला उपस्थित मेट्रो महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका बाजूला नेण्यात आलं. त्यानंतर CISF कर्मचारी आणि इतर महिला प्रवाशांच्या मदतीने या महिलेने एका मुलाला जन्म दिला. वरिष्ठांच्या सूचनेवरून सीआयएसएफ कॉन्स्टेबल अनामिका कुमारी तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. उपस्थित महिला प्रवाशांच्या मदतीने त्यांनी प्रसूती झालेल्या महिलेला प्लॅटफॉर्मवर प्रसूतीस मदत केली.
दिल्लीतील आनंद विहार मेट्रो स्टेशनवर एका 22 वर्षीय महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर मेट्रोची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या. ही घटना गुरूवारी दुपारी 3.25 च्या सुमारास घडली. त्यानंतर त्या महिलेला उपस्थित मेट्रो महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका बाजूला नेण्यात आलं. त्यानंतर CISF कर्मचारी आणि इतर महिला प्रवाशांच्या मदतीने या महिलेने एका मुलाला जन्म दिला. वरिष्ठांच्या सूचनेवरून सीआयएसएफ कॉन्स्टेबल अनामिका कुमारी तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. उपस्थित महिला प्रवाशांच्या मदतीने त्यांनी प्रसूती झालेल्या महिलेला प्लॅटफॉर्मवर प्रसूतीस मदत केली.
Prompt response and needful assistance by #CISF personnel helped a lady with labour pain to undergo an emergency delivery @ Anand Vihar ISBT, Metro Station. The mother along with newborn baby shifted to Hospital.#PROTECTIONandSECURITY with #HUMANITY@HMOIndia @MinistryWCD pic.twitter.com/J3JfcJgS4O
— CISF (@CISFHQrs) April 7, 2022
“दुपारी 3.25 वाजता आनंद विहार मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर मेट्रोची वाट पाहत असताना एका महिला प्रवाशाला प्रसूती वेदना झाल्या.तिथे तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांनी शिफ्ट प्रभारींना या प्रकरणाची माहिती दिली. महिलेला बाळंतपणासाठी मदत करण्यासाठी दलातील महिला कॉन्स्टेबल अनामिका कुमारी यांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आलं”, असं सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.