IAS अधिकाऱ्याचा रोमँटिक अंदाज, दीक्षा कौशल सोबत ‘पहली बार’, सोशल मीडियावर धुराळा!

अभिषेक सिंग यांचं 'पहली बार' हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यामध्ये ते दीक्षा कौशलसोबत रोमान्स करताना दिसत आहेत.

IAS अधिकाऱ्याचा रोमँटिक अंदाज, दीक्षा कौशल सोबत 'पहली बार', सोशल मीडियावर धुराळा!
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 12:01 PM

मुंबई : आयएएस अधिकारी म्हटलं की धीरगंभीर चेहरा अन् कायम समाजातील गंभीर विषयांवरच्या चर्चा असं सगळं डोळ्यासमोर उभं राहातं. पण आजकालचे तरूण आयएएस अधिकारी यापेक्षा जरा वेगळे ठरतात. त्यांच्या सोशल मीडियावरच्या विविध व्हीडिओ आणि फोटोंवरून ते दाखवून देतात. सध्या काही अधिकाऱ्यांच्या हटके अंदाजामुळे ते चर्चेत आहेत. असंच एक नाव म्हणजे आयएएस अधिकारी अभिषेक सिंग (Abhishek Singh). त्यांचं ‘पहली बार’ (pehali baar song) हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यामध्ये ते दीक्षा कौशलसोबत रोमान्स करताना दिसत आहेत.

‘पहली बार’ रोमॅन्टिक अंदाज

अभिषेक सिंग यांचं ‘पहली बार’ हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यामध्ये ते दीक्षा कौशलसोबत रोमान्स करताना दिसत आहेत. अभिषेक सिंग यांचा हा म्युझिक व्हीडिओ नुकताच रिलीज झालाय. यामध्ये ते जावेद अली आणि रुचिक कोहलीच्या गाण्यांवर परफॉर्म करताना दिसत आहेत. ‘पहेले बार’ हे गाणं गीतकार कुमार यांनी लिहिलं आहे. हा व्हीडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे.

अभिषेक सिंग यांनी या गाण्याचा व्हीडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. याला त्यांनी “एका सुंदर ठिकाणी एक अप्रतिम प्रेमकथा चित्रित करण्यात आली आहे”, असं कॅप्शन त्यांनी याला दिलं आहे.

अभिषेक सिंग कोण आहे?

अभिषेक हे मूळचे छत्तीसगडचे आहेत. त्यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1983 ला झाला. अभिषेक यांनी दिल्ली विद्यापीठातून बी.कॉम केलं आहे. 2011 मध्ये ते UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांना उत्तर प्रदेश केडर मिळाले. अभिषेक यांची पहिली पोस्टिंग कानपूर जॉइंट मॅजिस्ट्रेट म्हणून झाली होती. नंतर त्यांची दिल्लीला बदली झाली. ते सध्या दिल्लीत कार्यरत आहेत.अभिषेक यांना त्याच्या सांस्कृतिक उपक्रमांसाठी 2021 मध्ये ICONIC GOLD Awards 2021 ने सन्मानित करण्यात आलं. 2022 मध्ये त्यांना सामाजिक उपक्रमांसाठी TEDx FORESchool आणि BRICS चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

अभिषेक सिंग सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहेत. जिथे ते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात.इन्स्टाग्रामवर अभिषेक यांना 27 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. ट्विटरवर त्यांचे 24 हजार फॉलोअर्स आहेत. या आधी त्यांचं ‘दिल तोड के’ गाणं रिलीज झालं होतं. त्याला कोट्यावधी लोकांनी पाहिलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.