काय बाई… कमोड, टीव्ही, मोबाईल, अन्… कॅबमध्ये लोक काय काय विसरतात; यादी वाचाल तर हसत सुटाल
कॅबमध्ये अनोख्या गोष्टी सोडण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर आहेत. यामध्ये पाण्याच्या बाटल्या, चावी, चष्मा, झाडू, चालण्याची काठी, कॉलेजचे प्रवेशपत्र आणि टीव्ही सारख्या अनेक गोष्टींचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : टॅक्सी किंवा कॅबने (cab) प्रवास करणारे लोक अनेक वेळेस घाईघाईत महत्त्वाच्या गोष्टी कॅबमध्येच विसरतात. मोबाईल, लॅपटॉप, झाडू, वॉकिंग स्टिक आणि इतर अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. उबर कॅबने अलीकडेच लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स जारी केला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की वीकेंडमध्ये लोक टॅक्सीमधील बहुतेक सामान (things forgot in cab) विसरतात.
देशातील सर्वात विसराळू शहरांबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीचा सर्वात वरचा क्रमांक आहे. कॅबमध्ये सर्वाधिक सामान दिल्लीकरांनी सोडले, तर दिल्लीनंतर मुंबई, हैदराबाद आणि त्यानंतर बेंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहे. कॅबमध्ये अनोख्या गोष्टी विसरण्यातही भारतातील लोक पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यामध्ये पाण्याच्या बाटल्या, चाव्या, चष्मा, झाडू, चालण्याची काठी, कॉलेजचे प्रवेशपत्र आणि टीव्ही या गोष्टीही काही लोकं विसरून गेले आहेत.
सर्वात जास्त विसरले जाणारे सामान
1- कपडे
2- मोबाइल फोन
3- बॅगपॅक्स आणि पर्स
4- वॉलेट
5- हेडफोन
6- ज्वेलरी
7- चावी किंवा किल्ली
8- पुस्तकं
9- लॅपटॉप
10- घड्याळ
उबेरमध्ये विसरलेल्या सामानाविषयी मजेदार तथ्य –
– बहुतेक लोक शनिवारी Uber मध्ये सामान विसरतात.
– अनेक लोक उबरमध्ये अँड्रॉइड फोन विसरून गेले.
– टॅक्सीमध्ये, लोक लाल रंगाच्या गोष्टी सर्वात जास्त विसरतात.
– संध्याकाळी बरेच लोकं सामान विसरतात, बहुतेक वेळेस संध्याकाळी 7 च्या सुमारास लोक सामान विसरतात
कोणत्या शहरातील लोक सर्वात जास्त सामान विसरतात ?
1- दिल्ली 2- मुंबई 3- हैदराबाद 4- बंगळुरू
वर्षातील सर्वात विसराळू दिवस
1) 26 मार्च 2) 9 एप्रिल 3) 8 एप्रिल
भारतीय लोक कोणत्या वेळी सर्वात जास्त गोष्टी विसरतात ?
संध्याकाळी 7 वाजता रात्री 8 वाजता संध्याकाळी 6 वाजता
कॅबमध्ये विसरलेल्या अनोख्या गोष्टी
कैब में छूटी अनोखी चीजें
1- टीव्ही
2- वेस्टर्न कमोड
3- दूधाचे पॅकेट आणि पडदे
4- झाडू
5- कॉलेजचे आयकार्ड
6- वॉकिंग स्टीक
7- इंडक्शन स्टोव्ह
8- फॅमिली कोलाज
9- हेवी मशीनरी
10- प्रिंटेड दुपट्टा (स्कार्फ)
कॅबमध्ये राहिलेलं सामान परत कसे मिळवायचं ?
जर एखाद्या व्यक्तीचे सामान कॅबमध्ये राहून गेले तर ते परत कसे मिळवता येईल, हेही उबरने सांगितले आहे. कोणतीही हरवलेली वस्तू परत मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ड्रायव्हरला कॉल करणे, परंतु जर मोबाईल हरवला असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता –
– सर्व प्रथम, menu icon ओपन करावे
– त्यानंतर “Your Trips” वर जा आणि ज्या ट्रिपमध्ये तुम्ही तुमचे जे सामान विसरला असाल ते सिलेक्ट करा
– तेथे तुम्हाला “Find lost item” चा पर्याय दिसेल आणि नंतर “Contact driver about a lost item” वर क्लिक करा. ड्रायव्हरला कॉल करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकावा.
– तुमच्या ड्रायव्हरने तुमचे सामान कॅबमध्ये राहिल्याची पुष्टी केल्यास, तुम्ही तुमचे सामान परत मिळवण्यासाठी त्याच्याशी बोलून एखाद्या ठिकाणी भेटू शकता.
– जर ड्रायव्हरने कॉल उचलला नाही, तर तुमच्या सामानाबद्दल सविस्तर व्हॉइसमेल सोडा, जेणेकरून ड्रायव्हर तुमच्याशी संपर्क करू शकेल. तुमचे सामान परत करण्यासाठी ड्रायव्हरच्या रुटीनवरही परिणाम होईल, हेही लक्षात ठेवावे.