Viral Video लगीन गेलं चुलीत… नवरा-नवरीची मंडपातच दे धपाधप, वऱ्हाडी पसार; लोक म्हणाले, 36 गुण जुळतात की…
Bride Groom Viral Video : लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये वधू आणि वर स्टेजवरच एकमेकांना थप्पड मारताना दिसत आहेत.
Bride Groom Fight Video : मुलगा असो किंवा मुलगी, लग्नाचा (marriage) दिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो. हा दिवस म्हणजे वधू आणि वर सप्तपदी घेत सात जन्म एकत्र राहण्याचे वचन एकमेकांना देतात. पण लग्नमंडपातच वर-वधूचे भांडण (bride-groom fight) (झाले तर काय होईल ? सध्या असाच काही व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वधू-वर स्टेजवरच एकमेकांना थप्पड मारताना दिसत आहेत. मारामारीचा हा व्हिडीओ ज्यांनी पाहिला ते तर थक्क झाले.
एकमेकांना वरमाला घालण्याच्या समारंभानंतर वधू-वर मंचावर उभे राहिले. उत्सवाचे वातावरण होते. आजूबाजूला अनेक नातेवाईक आणि पाहुणेही उपस्थित होते. पण पुढच्याच क्षणी तिथे असे काही घडले की वधू आणि वर एकमेकांना जोरदार फटके मारू लागले. हे पाहून तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती बुचकळ्यात पडते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर दोघेही एकमेकांवर कसे रागावले होते. यादरम्यान एका व्यक्तीन त्यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला पण ते दोघेही थांबले नाहीत.
View this post on Instagram
वधू-वरांमध्ये झालेल्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @bridal_lehenga_designn नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टा वर व्हिडिओ शेअर करून युजरने कॅप्शन दिले आहे, आता विचार करा भाऊ, कोणाला लग्न करायचे आहे. एक दिवसापूर्वी अपलोड केलेल्या व्हिडिओला शेकडो लोकांनी लाईक केले आहे. सोबतच हा व्हिडिओ पाहून लोक जोरदार कमेंट करत आहेत.
पण काही युजर्सना वाटतं की हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असू शकतो. आता हे खरं आहे की नाही माहित नाही, परंतु वधू-वरांनी ज्या प्रकारे एकमेकांना थप्पड मारली ते पाहून बहुतेकांना हसू आवरता आले नाही. काही युजर्सनी म्हटले की यांचे तर 36 पैकी 36 गुण जुळलेत की..!