Video : अन् हेलिकॉप्टर रस्त्यावर धावू लागलं… विश्वास बसत नसेल तर व्हीडिओ पाहा…
Viral Video : बिहारमधल्या खगरिया इथल्या दिवाकर कुमार यांनी एक वेगळी गोष्ट निर्माण केलीये. या व्यक्तीने एका कारचं रुपांतर चक्क हेलिकॉप्टरमध्ये केलंय. या कलाकृतीला अनेकांची पसंती मिळताना दिसतेय.
मुंबई : सध्या इंटरनेटमुळे विविध गोष्टी प्रकाश झोतात येतात. सध्या एक हेलिकॉप्टरचा व्हीडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हीडिओ पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. तर अनेकांनी कमेंट करत हे कसं शक्य आहे? असं म्हटलंय. भारतात टॅलेंटची कमी नाही. असंच भारताचं टॅलेंट दाखवणारी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही गोष्ट आहे बिहारमधली. बिहारमधल्या खगरिया इथल्या दिवाकर कुमार यांनी एक वेगळी गोष्ट निर्माण केलीये. या व्यक्तीने एका कारचं रुपांतर चक्क हेलिकॉप्टरमध्ये (Helicopter Video) केलंय. या कलाकृतीला अनेकांची पसंती मिळताना दिसतेय. मुळात हे हेलिकॉप्टर नाही तर ती आहे कार पण सेम टू सेम हेलिकॉप्टरसारखी दिसणारी. या कारला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
व्हायरल व्हीडिओ
बिहारमधल्या खगरिया इथल्या दिवाकर कुमार यांनी एक वेगळी गोष्ट निर्माण केलीये. या व्यक्तीने एका कारचं रुपांतर चक्क हेलिकॉप्टरमध्ये केलंय. या कलाकृतीला अनेकांची पसंती मिळताना दिसतेय. मुळात हे हेलिकॉप्टर नाही तर ती आहे कार पण सेम टू सेम हेलिकॉप्टरसारखी दिसणारी. या कारला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Captured this amazing #WagonR turned Helicopter Car in my hometown. This is being used to carry Bride-Groom & currently in demand during this wedding season. Bihari Engineering! Jai Bihar.@anandmahindra @RNTata2000 @Maruti_Corp @TataMotors pic.twitter.com/bjWkPrvYRc
— Abbas Naqvi (@BeingAbbasNaqvi) November 30, 2021
कधी कुणी विचारही केला नसेल की कारचं रूपांतर हेलिकॉप्टरमध्ये होऊ शकतं. पण दिवाकर कुमार यांनी हे करून दाखवलंय. हा व्हीडिओ BeingAbbasNaqvi या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या कारमध्ये वधू बसलेली दिसत आहे. “माझ्या गावाकडे मी ही अशी भन्नाट कार पाहिली. जी कार नसून चक्क हेलिकॉप्टर आहे. याचा वापर वधू-वरांची ने-आणीसाठी केला जात आहे. यंदाच्या लग्नाच्या सिझनमध्ये याला मोठी मागणी आहे. बिहारी अभियांत्रिकी! जय बिहार”, असं कॅप्शन याला देण्यात आलं आहे.
दिवाकर कुमार यांनी या कार- हेलिकॉप्टरबद्दल सांगतात की, “अशी कार बनवण्याची प्रेरणा मला यूट्यूबवरच्या काही व्हीडिओतून मिळाली. मी यूट्यूबवर असे काही व्हीडिओ पाहिले आणि मलाही अशी कार बनवण्याची इच्छा निर्माण झाली. ही कार तयार करण्यासाठी साडेतीन लाख रूपये खर्च आला. या कारचा वापर लग्न समारंभासाठी करण्यावर माझा भर आहे.”
संबंधित बातम्या