Video : ट्रॅक्टर ट्रेनचा देशी जुगाड, लोक म्हणाले भारताची नवी ट्रेन आली
या व्हिडिओला 1 कोटीहून अधिक व्ह्यूज आणि 8 लाख 71 हजाराहून लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय हजारो युजर्सने या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.
जगात जुगाड करणाऱ्यांची काही कमी नाही. या जुगाडाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ लोकांची मने जिंकून घेतात. सध्या एका व्यक्तीचा देशी जुगाडाचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. या व्हिडिओतील काकाचा देशी जुगाड (Desi Jugad) पहाल तर मेट्रो ट्रेनची आठवण येईल. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामसह (Instagram) अन्य सोशल साईटवर धुमाकूळ घालत आहे.
व्हिडिओला एक कोटीहून अधिक व्ह्यूज
हा व्हिडिओ its_panther_official या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत ‘मेरे पापा की रेल’ असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सच्या अधिक पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओला 1 कोटीहून अधिक व्ह्यूज आणि 8 लाख 71 हजाराहून लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय हजारो युजर्सने या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
काय आहे व्हिडिओत?
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरुन ट्रॅक्टर घेऊन जात आहे. या ट्रॅक्टरला 20 हातगाड्या जोडल्या आहेत आणि या हातगाड्यांवर सामान ठेवण्यात आले आहे. या व्यक्तीची शक्कल पाहून तुम्ही विचार कराल, ट्रॅक्टर आहे की रेल्वेगाडी. हा देशी जुगाडाचा व्हिडिओ युजर्स या ट्रॅक्टर ट्रेनला अधिक पसंती देत आहेत.
युजर्सकडून अनेक कमेंट्स
ट्रॅक्टरचा हा व्हिडिओ पाहून एका युजरने बुलेट ट्रेन आली, असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे. अन्य एकाने भारताची नवी ट्रेन असे लिहिले आहे.