लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीच नवरीने घेतला घटस्फोट, कारण ऐकाल तर कपाळाला हात लावाल

लग्न सोहळ्याच्या घरात आनंदी उत्सवच सुरु असताना नवऱ्याने असे काही केले की हसणारं खेळणारं घर चिंतेत बुडालं. नव्या नवरीसोबत नवऱ्याने असं काही केल की नवरीने थेट त्याला घटस्फोट देण्याचा निर्णयच घेतला.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीच नवरीने घेतला घटस्फोट, कारण ऐकाल तर कपाळाला हात लावाल
MarriageImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 7:09 PM

नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : लग्न म्हणजे साता जन्माच्या रेशीम गाठी असं म्हटलं जातं. लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन म्हटलं जातं. लग्न होऊन दुसरा दिवस म्हणजे दोन कुटुंबांसाठी आगळा वेगळा सोहळा असतो. घरातील पाहुण्यांच्या वर्दळी त्यांच्या हसण्याने घरामध्ये जीवंतपणा आलेला असतो. मज्जामस्करी सुरु असते. नव्या नवरीची आणि नवऱ्याची मुद्दामहून छेड काढली जाते. त्यांना चिडवून मजा घेतली जाते. परंतू एका कुटुंबात लग्नाचा दुसरा दिवसच असा उजडला की लग्न थेट मोडूनच गेलं.

लग्न सोहळ्याच्या घरात आनंदी उत्सवच सुरु असताना नवऱ्याने असे काही केले की हसणारं खेळणारं घर चिंतेत बुडालं. नव्या नवरी सोबत नवऱ्याने असं काही केल की नवरीने थेट त्याला घटस्फोट देण्याचा निर्णयच घेतला. या घटनेने जगातील अनेक जणाचं लक्ष्य याकडे गेले आहे. नवऱ्याला अशी काही हुक्की आली की त्याच्या कुरापतीमुळे नवरीने थेट सोडचिट्टीच दिली.

यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीनूसार या तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडने साल 2020 रोजी प्रपोज केले होते. दोघांनी लग्नाच्या जबाबदाऱ्या आपआपसात वाटून घेतल्या होत्या, लग्न होईपर्यंत सर्वकाही सुरळीत सुरु होते.पण नको ते झालंच..

विश्वास होता अशी चूक करणार नाही

नवरी मुलीने सांगितले की तिने लग्नापूर्वी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला एकच अट घातली होती. तिच्या चेहऱ्याला कधी केक लावू नये. मला तो चांगलं ओळखत होता. तो अशी चूक कधी करणार नाही अशी मला खात्री होती. परंतू लग्नात त्याने माझी ही मस्करी केली. भर लग्नात त्याने माझी मान पकडून माझा चेहरा केकमध्ये घातला.

पूर्ण तयारीने केला  होता प्रॅंक

नवरीने सांगितले की एवढं समजावूनही तिच्या पतीने ठरवून माझी खोडी काढली. कारण दुसरा केक त्याने आणून ठेवला होता. मला हा प्रकार अजिबात आवडला नाही. आणि मी दुसऱ्याच दिवशी आपलं नातं आता संपल्याचे सांगितले. माझे कुटुंबिय म्हणतात की मी त्याला माफ करावे आणि दुसरी संधी द्यावी, त्यांना वाटतंय की ओव्हर रिएक्ट करतेय.

लोकांनी दिले विविध सल्ले

माझ्या पतीला हे कळायला हवे होते की कार अपघातामुळे मला मानसिक आघात झाला आहे. त्यामुळे अशा प्रकाराने मला घाबरायला होते. मी माझ्या चुकीचं केले का ? असे तिने पोस्ट लिहून वाचकांना विचारले. त्यावर अनेकांनी तिला विविध सल्ले दिले. एकाने म्हटले की तुमच्या पतीचा हा आगाऊपणा नातं सुरु होण्याआधीचा इशारा होता. तुम्हाला वेगळं व्हायलाच हवे. तर एका युजरने म्हटले की या कारणासाठी कोणी सोबत सोडतं का ?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.