मुंबई : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba Viral Video) म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहतात. बागेश्वर बाबा (Bageshwar Baba Trending video) देशात सध्या अनेक ठिकाणी प्रवचन करीत आहेत. बागेश्वर बाबा कधी हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची चर्चा करीत आहेत. तर कधी गीतातील एका श्लोकवरुन वादग्रस्त विधान ते करीत आहेत. सध्या एक वेगळाचं व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये बागेश्वर बाबांनी महिलांच्या बाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बागेश्वर बाबाचं ते विधान सोशल मीडियावर (social media) चांगलचं व्हायरल झालं आहे. त्याचबरोबर लोकं बाबाची खरी-खोटी कहानी सांगत आहेत.
बागेश्वर बाबा प्रत्येक महिलांच्या बाबत वादग्रस्त विधान करीत असतात. त्यांनी आता ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांबाबत एक विधान केलं आहे. त्यांनी ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिलांना काळं जाभूळं म्हटलं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, बागेश्वर बाबा म्हणत आहे की, सगळ्यात जास्त शाप कोणाला लागेल तर तो ब्युटी पार्लरवाल्यांना लागेल. ते काळ्या जांभळावरती सुध्दा चांगलं फाउंडेशन लावतं आहेत. त्या व्हिडीओची एवढीचं एक क्लिप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लोकांच्यासमोर गेल्यामुळे लोकांनी बाबांना निशाना साधायला सुरुवात केली आहे. काही लोकांनी कमेंटच्या माध्यमातून बाबांचा चांगलाचं समाचार घेतला आहे.
“सबसे ज़्यादा अगर श्राप लगेगा तो ब्यूटी पार्लर वालो को लगेगा, यह लोग काली जामुन पर भी तेज़ फाउंडेशन लगा देते है”pic.twitter.com/A4Gq9r42rW
— 𝑯𝒖𝒔𝒔𝒂𝒊𝒏 محمد (@TheJavaCoder_) August 29, 2023
बागेश्वर बाबाचा हा पहिला व्हिडीओ नाही, याच्या आगोदर सुद्धा त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हि़डीओमध्ये बागेश्वर बाबा म्हणतं होते की, डोक्यात कुंकु न लावणाऱ्या महिला एखाद्या खाली प्लॉट सारखी दिसत असते. त्या व्हिडीओनंतर सुध्दा अधिक वाद झाला होता.