Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : 3 हजार फूट उंच टेकडीवर गणपतीचं मंदीर, तुम्हाला या ठिकाणाचे नाव माहित आहे का ?

भारतात अशी असंख्य मंदिर आहेत. तिथं लोकांची श्रध्दा आहे. त्याचबरोबर अनेक अडचणींचा सामना करुन लोकं तिथं दर्शनासाठी जात असल्याचं वारंवार पाहायला मिळालं आहे. 

VIDEO : 3 हजार फूट उंच टेकडीवर गणपतीचं मंदीर, तुम्हाला या ठिकाणाचे नाव माहित आहे का ?
Ganesh Temple Viral Video (1)Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 1:18 PM

मुंबई : भारतात काही अशी मंदीर (Ganesh Temple) आहेत, तिथं श्रद्धा आहे. त्याचबरोबर काही मंदीरं देशात अशी आहेत की पाहिल्यानंतर तुमचं मन एकदम खुष होऊन जाईल. त्याचपद्धतीने एक गणेशाचं मंदीर आहे. मंदीर जंगलात आहे, तिथं जाणं प्रत्येकाला शक्य नाही. त्या मंदीराचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) अधिक व्हायरल झाला आहे. लोकांनी त्या व्हिडीओला अधिक लाईक केले आहे. त्याचबरोबर तो व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ (Viral Video) छत्तीसगडचा असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर ते मंदीर साधारण तीन हजार फूट उंच टेकडीवर आहे.

समुद्राच्या तळापासून तीन हजार फूट उंचीवर

खरतर, गणेशाचं हे मंदीर छत्तीसगढ़च्या ढोलकल डोंगराच्यावरती आहे. तिथं लोकांची दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली असते. लोकांच्या म्हणण्यानुसार हे मंदीर समुद्राच्या तळापासून तीन हजार फूट उंचीवर आहे. त्याचबरोबर हे मंदीर एक हजार वर्षापूर्वीचं असण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. तिथं असलेली गणेशाची मुर्ती ढोलक आकाराची आहे. व्हिडीओत दिसत असलेल्या मूर्तीमध्ये गणेशाने उजव्या हातात एक फारो, वरच्या डाव्या हातात त्याचा तुटलेला दात पकडला आहे. त्यानंतर खाली असलेल्या हातांमध्ये पुष्पहार आणि मोदक दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

तो व्हिडीओ आतापर्यंत चार लाख लोकांनी पाहिला

हा व्हिडीओ सोशल मीडियावर _adeeee_thakur750 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तो व्हिडीओ आतापर्यंत चार लाख लोकांनी पाहिला आहे. ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, ती लोकं या व्हिडीओच्या खाली कमेंट करीत आहेत. एका नेटकऱ्याने ‘लाइव गणेश आरती.’असं म्हटलं आहे.

भारतात अशी असंख्य मंदिर आहेत. तिथं लोकांची श्रध्दा आहे. त्याचबरोबर अनेक अडचणींचा सामना करुन लोकं तिथं दर्शनासाठी जात असल्याचं वारंवार पाहायला मिळालं आहे.  अनेकदा अडचणीच्या ठिकाणी जाण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी आजही भक्तांना कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.