Girl Dance Viral Video : Instagram Reels बनवणाऱ्या तरुणीचा रस्त्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी रिल्स स्टार काय करतील हे सांगता येत नाही. त्याचच एक उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडीओ (Girl Dance Viral Video) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये ती रोडवर दिलबर-दिलबर या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिच्या ह्या डान्स करतानाच्या व्हिडीओमध्ये एक रिक्षावाला देखील दिसत आहे. त्या रिक्षावाल्याला देखील दिलबर दिलबर या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही त्याने देखील त्या मुलीच्या स्टेपवर डान्स करण्याचा अफलातून प्रयत्न केला आहे. म्हणूनच हा अतरंगी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये नक्की आहे तरी काय?
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी रिल्स स्टार काय करतील हे सांगता येत नाही. त्याचच एक उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होणारा हा व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये एक मुलगी चक्क रस्त्यावर दिलबर-दिलबर या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. रिल्स बनवण्यासाठी तिने हा व्हिडीओ काढला आहे. मात्र या व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालक देखील दिसत आहे. मुलगी डान्स करत असल्याच बघताच रिक्षाचालकाने आपल्या झिंगाट स्टाईलमध्ये डान्स करण्याचा प्रयत्न तिच्यासोबत केला आहे.
व्हायरल होणारा व्हिडीओ हा बाजार पेठेतील वाटत आहे. एखाद्या व्हिडीओमध्ये कोणी सुंदरा दिसली की तो व्हिडीओ व्हायरल होण्याची शक्यता असते. पण या व्हिडीओत उलट झालं आहे. हा व्हिडीओ रिक्षाचालकाच्या डान्समुळे व्हायरल होत आहे.
या दोघांच्या अफलातून डान्सची केमेस्ट्री सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.