VIDEO: गाडी मेरी टू सीटर, उसमे लगा है एक हीटर; ढिंचॅक पूजाचं नवं गाणं ऐकलंत का?
चँक पूजाची 'सेल्फी साँग', 'दारू साँग' आणि 'होगा ना कोरोना' ही गाणी प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती | Dinchak pooja
मुंबई: गाण्याच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ढिंचँक पूजा (Dinchak pooja) हिचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. दिलों का शूटर है मेरा स्कूटर’ या गाण्यामुळे ढिंचॅक पूजा रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती. या गाण्यानंतर तिला यूट्यूब सेंसेशन म्हणून ओळखले जाऊ लागले होते. यापूर्वी ढिंचॅक पूजाची ‘सेल्फी साँग’, ‘दारू साँग’ आणि ‘होगा ना कोरोना’ ही गाणी प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. (Dinchak pooja new song on youtube)
मात्र, बऱ्याच दिवसांत ढिंचॅक पूजाचं नवं गाणं रिलीज झालं नव्हतं. त्यामुळे तिचे चाहते काहीसे हिरमुसले होते. मात्र, आता ढिंचॅक पूजाच्या नव्या गाण्यामुळे तिच्या तमाम चाहत्यांचे मनोरंजन होणार आहे. ‘गाड़ी मेरी टू सीटर’ या तिच्या नव्या गाण्याला यूट्यूबवर चांगलीच पसंती मिळत आहे.
‘गाड़ी मेरी टू सीटर’ ढिंचॅक पूजाचं नवं गाणं
गाड़ी मेरी टू सीटर उसमें लगा है एक हीटर चलाता है उसको पीटर स्पीड का गया टूट मीटर
पूजाच्या गाण्यातील पोर्शे कारही चर्चेत
ढिंचॅक पूजाच्या गाण्यांचे अनोखे सादरीकरण हादेखील एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. ‘गाड़ी मेरी टू सीटर’ या गाण्यात ढिंचॅक पूजा पोर्शे गाडीत दिसत आहे. पोर्शे ही जगातील अत्यंत महागड्या गाड्यांपैकी एक आहे.
ढिंचॅक पूजाच्या या गाण्यामुळे लोकांचे खूप मनोरंजन होत आहे. ढिंचॅक पूजाच्या गाण्याच्या शैलीची खिल्ली उडवली जात असली तरी आतापर्यंत gaadi meri 2 seater या गाण्याला 4 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. ट्रोलिंग टाळण्यासाठी ढिंचॅक पूजाने या गाण्याखालचा कमेंटचा पर्याच बंद ठेवला आहे.
संबंधित बातम्या:
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं अमृता फडणवीसांचं इंग्रजी गाणं
VIDEO: अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ऐकलंत का?
व्हॅलेंटाईनच्या दिवशी अमृता फडणवीसांचं नवं गाणं, आमदार महेश लांडगे म्हणतात, ‘नाईस व्हॉइस…!’
(Dinchak pooja new song on youtube)