VIDEO | प्रबळ इच्छाशक्तीपुढे दिव्यांगत्वही हरलं, व्हिडीओ पाहून अरविंद केजरीवाल म्हणाले…

हार न मानता यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या निखिलचीसुद्धा चर्चा होत आहे. त्याची दखल थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरवींद केजरीवाल यांनी घेतली आहे. (disabled nikhil paralympic gold medal arvind kejriwal jump video)

VIDEO | प्रबळ इच्छाशक्तीपुढे दिव्यांगत्वही हरलं, व्हिडीओ पाहून अरविंद केजरीवाल म्हणाले...
DELHI DISABLE NIKHIL
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 7:27 PM

नवी दिल्ली : मनात जिद्द असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करुन दाखवता येते असं म्हटलं जातं. त्याची काही उदाहरणंसुद्धा आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहेत. कोणतेही साधन नसताना अत्यंत बिकट परिस्थितीत यशीची शिखरं पार केलेले अनेकजण आज लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरतायंत. दिव्यांग असूनसुद्धा आपापल्या क्षेत्रात जबदरस्त कामगिरी करणारे अनेकजण आहेत. याच निमित्ताने हार न मानता यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या निखिलचीसुद्धा सध्या चर्चा होत आहे. त्याची दखल थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी घेतली आहे. (disabled student Nikhil from Delhi government school willing to win Paralympic gold medal Arvind Kejriwal blessed him video of his jump goes viral)

दिव्यांग निखील जम्पिंगमध्ये तरबेज

निखील दिव्यांग आहे. एक पाय नसल्यामुळे त्याला अनेक अडचणी येतात. मात्र, आपल्या अडचणींचा उगीचच बाऊ न करता दिव्यांगतेपेक्षा माझे स्वप्न कितीतरी मोठे असल्याचे तो सांगतो. तो जम्पिंगमध्ये अगदीच तरबेज असून एका पायावर कुठल्याही आधाराविना तो लॉंग जम्प तसेच राऊंड जम्प करु शकतोय. मनू गुलाटी यांनी निखील उडी घेतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर अनेकजण निखीलची वाहवा करत आहेत. अनेकजण त्याच्या जिद्दीला सलाम ठोकत आहेत. मला माझ्या देशासाठी  पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकायचे आहे, असे तो जिद्दीने सांगतोय.

थेट केजरीवाल यांच्याकडून दखल

मनू गुलाटी यांनी निखीलचा हा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर त्याच्या जिद्दीची अनेकांनी प्रशंसा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा त्याला सलाम ठोकत मेहनत करणारे अपयशी होत नाहीत,असं म्हटलंय. तसेच दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मुलांना मंच भेटत असून निखिल त्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, निखीलचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर, त्याचे अनेक स्तरातून स्वागत केला जात आहे. त्याच्या जिद्दीला सलाम करुन त्याच्या आगामी भविष्याला अनेकजणांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

इतर बातम्या :

5 सेकंदात चितपट ! शिंगावर उचलताच सिंहाला पळता भूई थोडी, व्हिडीओ पाहाच

हातगाड्यावर मक्याचे कणीस विकणाऱ्या आजीची डोक्यालिटी, थेट माजी क्रिकेटपटूने घेतली दखल

हे फक्त हात नाहीत, जगण्याची आशा आहेत, महामारीतलं काळीज चिरणारं वास्तव

(disabled student Nikhil from Delhi government school willing to win Paralympic gold medal Arvind Kejriwal blessed him video of his jump goes viral)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.