No Job For Divorced : नको लफडं वा घटस्फोट, तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा!

No Job For Divorced : या कंपनीत नोकरी करायची असेल तर मात्र दंडक पाळवा लागेल. या कंपनीने तसा फतवाच काढला आहे. नोकरी करायची असेल तर तुमचे लफडं तर नकोच पण घटस्फोट ही झालेला नको, असा नियम या कंपनीने ठरवला आहे.

No Job For Divorced : नको लफडं वा घटस्फोट, तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा!
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 7:09 PM

नवी दिल्ली : आतापर्यंत बेशिस्त, कामचुकारपणा, आर्थिक परिस्थिती, कंपनीचे धोरण, मंदी अथवा इतर कारणाने नोकरी गेल्याचे तुम्ही ऐकले असेलच. पण विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affairs) आणि घटस्फोट घेतल्याने कोणाची नोकरी गेल्याचे तुम्ही कधी ऐकलंय का? विचार करा की काही कारणास्तव एखाद्याचा घटस्फोट (Divorce) झाला अथवा लग्नानंतर त्याच्या दुसऱ्या प्रेमाची गोष्ट सुरु झाली तर त्याला नोकरीवरुन थेट फायर करतील का? पण या कंपनीने असा फतवा काढला आहे. या कंपनीने तसा दंडकच घालून दिला आहे. या नियमामुळे काही कर्मचाऱ्यांची गोची झाली आहे, हे वेगळं सांगायला नको.

कुठे आले हे गंडांतर तर ही काही भारतीय कंपनी नाही. हा नियम आपला शेजारी असलेल्या चीनमधील एका कंपनीने घालून दिला आहे. एका कॉर्पोरेट कंपनीने त्यांच्या एचआर पॉलिसीमध्ये या नियमाचा समावेश केला आहे. चीनच्या झेजियांगमधील एका कंपनीने हा नियम लागू केला आहे. कर्मचाऱ्याचे विवाबाह्य संबंध असेल अथवा घटस्फोट झाला तर त्याला कामावर राहता येणार नाही, असा इशारा कंपनीने दिला आहे. अर्थात या नियमामुळे वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर टीका पण करण्यात येत आहे.

पती-पत्नीत प्रेम वाढविण्यासाठी कसरत अर्थात कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा हा प्रकार असल्याचे आपल्याला वाटेल. पण कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ही कंपनी कॉर्पोरेट कल्चर विकसीत करु इच्छित असून, पती-पत्नीत चांगले संबंध असावेत. त्यामुळे कर्मचारी आनंदी राहील आणि कामावर लक्ष केंद्रीत करेल. कर्मचारी त्याच्या कुटुंबियांना कंपनी दाखवतील. विविध कार्यक्रमांना कुटुंबियांसह हजेरी लावतील, यासाठी कंपनीने ही कसरत सुरु केली आहे. कंपनीचा उद्देश चांगला असल्याचा दावा करण्यात येत आहे. 9 जून पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. लग्न झालेल्या कर्मचाऱ्यांवर हा नियम लागू असेल .

हे सुद्धा वाचा

सोशल मीडिया ढवळून निघाला कंपनीच्या या नियमावर चीनमधील सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेकांना हा नियम कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणारा वाटतो. तर काहींना हा नियम योग्य वाटतो. यामुळे वैयक्तिक आयुष्यात कर्मचारी आनंदात राहतील. वर्क कल्चर सुधारेल. कंपनी व्यवस्थापनाशी कर्मचाऱ्यांचे नाते घट्ट होईल, असे काहींना वाटते.

सामाजिक मूल्य टिकतील कंपनीच्या मते, पती-पत्नीत प्रेम असणे महत्वाचे आहे. कौटुंबिक कलह असेल तर कर्मचाऱ्याचे कामावर लक्ष नसेल. तसेच त्याचे बाहेर अफेअर असेल तरी तो काम टाळण्याचे अथवा त्याला बगल देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे समाजात आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांचे मूल्य जपण्यासाठी हा नियम तयार केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

कुटुंबियांनी केले स्वागत अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काही कर्मचाऱ्यांनी पण निर्णय योग्य असल्याचे वाटते. त्यामुळे कर्मचारी काय काम करतात. किती राबतात, हे कुटुंबियांना कळेल. त्यांना कंपनीच्या कार्यक्रमात सहभागी होता येईल. कर्मचाऱ्याच्या मनावरील ताण कमी होईल, असे कुटुंबियांना वाटते. तर काहींना हा मनमानी निर्णय असल्याचे वाटते.

येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.