Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral video : मेंढीला गुदगुल्या का करतोय ‘हा’ कुत्रा? कारण वाचून तुम्हालाही हसायला येईल

Animal funny video : एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा एका मेंढीला (Sheep) अडचणीत मदत करताना दिसत आहे. मात्र, मदत करण्यासाठी कुत्रा ज्या पद्धतीचा अवलंब करतो ते पाहून तुम्हाला हसायला येईल.

Viral video : मेंढीला गुदगुल्या का करतोय 'हा' कुत्रा? कारण वाचून तुम्हालाही हसायला येईल
मेंढीला वाचवण्यासाठी कुत्र्यानं लढवली शक्कलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 11:37 AM

Animal funny video : कुत्र्यांपेक्षा (Dog) निष्ठावान प्राणी या पृथ्वीतलावर तरी दुसरा कोणी नाही. माणसांचीही निष्ठा थोडी कमी होऊ शकते, पण कुत्र्यांची त्यांच्या मालकावरची निष्ठा काही कमी होत नाही. म्हणूनच त्यांना जगातील सर्वात निष्ठावान प्राणी म्हटले जाते. ते त्यांच्या मालकांवर जीव ओवाळून टाकतात. मालक अडचणीत आला तर त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी कुत्रे जीव ओततात. त्यावेळी त्यांच्यासमोर कसले संकट उभे आहे याची त्यांना पर्वा नसते. अशा स्थितीत सिंहही आला तर काहीही विचार न करता कुत्रे त्याचा प्रतिकार करू शकतात. मात्र, काही वेळा कुत्रे इतरांना अडचणीत पाहून मदत करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा एका मेंढीला (Sheep) अडचणीत मदत करताना दिसत आहे. मात्र, मेंढीला मदत करण्यासाठी कुत्रा ज्या पद्धतीचा अवलंब करतो ते पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.

करतो गुदगुल्या

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की झाडाच्या फांदीमध्ये एक मेंढी अडकली आहे आणि एक कुत्रा तिच्या मदतीला येतो. मेंढीला तिथून बाहेर काढण्यासाठी, कुत्रा प्रथम तिला पुढे ढकलतो, परंतु जेव्हा तो त्यात अपयशी ठरतो, तेव्हा तो एक मजेदार युक्ती वापरतो. तो पलीकडून येतो आणि मेंढीला गुदगुल्या करू लागतो, त्यामुळे मेंढी उडी मारते आणि त्यामुळे तीही संकटातून बाहेर पडते आणि घाईघाईत तिथून पळून जाते.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर koyun_kangal नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 4.2 मिलियन म्हणजेच 42 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर 58 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मेंढ्यांना यशस्वीरित्या वाचवल्याबद्दल लोकांनी कुत्र्याचे कौतुक केले आणि त्याचवेळी, त्याने वापरलेल्या युक्तीवर हसले.

आणखी वाचा :

होय..! ‘ती’ सर्वकाही करू शकते, ‘या’ चिमुरडीला पाहून तुम्हीही हेच म्हणाल; Kid stunt video viral

गर्मी में सर्दी का एहसास… Desi jugaad कसं करायचं ते ‘यांच्या’कडून शिका..! Funny Video viral

कोणत्या ग्लासमध्ये कोणतं Drink? ही स्पर्धक ओळखते की नाही? पाहा ‘हा’ Viral video

'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?.
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र
'औरंगजेब एक राजा, त्याच्यावर मीच का बोलावं?', जलील यांचं जनतेला पत्र.
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्
नागपूर राड्यादरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग, अंधाराचा फायदा घेतला अन्.
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास
९ महिने, माणसांपासून दूर,असा होता सुनीता विल्यम्सचा ग्रहवापसीचा प्रवास.
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.