Dog Arrested: मालकाच्या बेईमानीची शिक्षा भोगतोय कुत्रा; पोलिसांनी अटक केलेल्या कुत्र्याचे जेलध्ये होत आहेत भयंकर हाल
हे प्रकरण बक्सर जिल्ह्यातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका अलिशान कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारु साठा आढळून आला. पोलिसांनी या दारूसह दोघांना अटक केली. याच कारमधून पोलिसांनी एका परदेशी जातीचा कुत्रा देखील सापडला.
बक्सर : कुत्रा हा एक इमानदार प्राणी मानला जातो. तो कधीही आपल्या मालकाला दगा देत नाही. यामुळेच कुत्र्याला एक निष्ठावान प्राणी देखील मानले जातो. मात्र, एका कुत्र्याला त्याच्या इमानदारीची कूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. मालकाच्या बेईमानीची शिक्षा एका कुत्र्याला भोगावी लागत आहे. मालकाच्या चुकीमुळे बिहारमध्ये(Bihar) एक कुत्रा दारूबंदीची शिक्षा भोगत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या कुत्र्याचे जेलध्ये भयंकर हाल होत आहेत(Dog Arrested).
कारमध्ये दारूसह कुत्रा सापडला
हे प्रकरण बक्सर जिल्ह्यातील मुफसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एका अलिशान कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारु साठा आढळून आला. पोलिसांनी या दारूसह दोघांना अटक केली. याच कारमधून पोलिसांनी एका परदेशी जातीचा कुत्रा देखील सापडला.
पोलिसांनी कुत्र्याला ताब्यात घेतले
पोलिसांनी दारू आणि कार जप्त करून अटक केलेल्या दोघांची तुरुंगात रवानगी केली. अटक केलेल्या या दोघांसह पोलिसांनी कुत्र्याला देखील ताब्यात घेतले. मात्र कुत्रा पोलिसांसाठी अडचणीचा ठरला. हा कुत्रा परदेशी जातीचा आहे. यामुळे पोलीस ठाण्यात त्याची व्यस्थित निगा राखने पोलिसांना जमत नाही. याचा कुत्र्याच्या आरोग्यावर झपाट्याने परिणाम होत आहे. अशा स्थितीत आता पोलिसांना कुत्र्याची चिंता सतावत आहे.
कुत्रा पोलिसांसाठी अडचणीचा ठरला
ज्या कारमधून दारू आणि कुत्रा पकडण्यात आला आहे ती ओडिशामध्ये राहणाऱ्या एफसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची आहे. अटक केलेले आरोपी या कार मधून दारु घेऊन त्याच्याकडे जात होते. मात्र, तपासणीदरम्यान कार पोलिसांनी ताब्यात घेतली. चौकशी दरम्यान अटक केलेल्यांनी कुत्रा आपलाच असल्याचे सांगितले. अशा स्थितीत पोलिसांनीही वाहन मालकावर गुन्हा दाखल करून त्याला त्याच्या पाळीव कुत्र्याला घेऊन जाण्यासाठी बोलावले. मात्र गुन्हा दाखल झाल्याने मालक पोलिस ठाण्यात येत नसल्याने पोलिसांना कुत्र्याला त्याच्या मालकापर्यंत नेणे शक्य होत नाही. त्यामुळे आता पोलीस चिंतेत आहेत.
मालकाच्या बेईमानीमुळे कुत्रा अस्वस्थ
कुत्र्याचा मालक त्याला नेण्यासाठी येत नसल्यामुळे कुत्र्याला पोलिस ठाण्यात अडचणी येत आहेत. त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्यामुळे पोलिसांचीही चिंता वाढली आहे. मुफसिलचे एसएचओ अमित कुमार यांच्या म्हणण्यानुसार हा कुत्रा परदेशी जातीचा आहे, त्यामुळे त्याची योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र पोलीस ठाण्यात सुविधा नसल्यामुळे कुत्र्याची योग्य काळजी घेतली जात नाही. मालक न आल्यास कुत्र्याला अॅनिमल शेल्टर होममध्ये ठेवण्याची व्यवस्था केली जाईल, असे पोलिसांनी सांगीतले.