VIDEO | मुलींचा डान्स पाहण्यासाठी कुत्रा स्टेजवर चढला, असा मजेशीर व्हिडिओ आजपर्यंत तुम्ही कधीच पाहिला नसेल
Dog Funny Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुली एका स्टेजवरती डान्स करीत आहेत. त्याचवेळी एक लहानसा कुत्रा स्टेजवरती एखादा प्रमुख पाहुणा असल्यासारखा चढतो. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर प्रत्येकजण हसत आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी कॉमेडी व्हिडीओ (Dog Funny Viral Video) पाहायला मिळतात. अशा पद्धतीचे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरत नाही. खरंतर अधिक तर लोकांना आपला मूड ठिक करण्यासाठी अशा पद्धतीचे व्हिडीओ पाहायला आवडतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक कुत्रा डान्स (Dance) सुरु असताना स्टेजवरती चढला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओ आमचं मनं जिंकलं असल्याचं कमेंटमध्ये लिहिलं आहे.
सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन मुली एक स्टेजवर डान्स करण्यात गुंग आहेत. स्टेजवरती लाईट कमी असल्याचं दिसतं आहे. एका गाण्यावर जोरात डान्स सुरु असताना, कुत्रा स्टेजवरती येतो आणि त्यानंतर पाहणारे लोकं त्या कुत्र्याला पाहून अधिक हसतात. कारण तो कुत्रा स्टेजवरती जाऊन त्या डान्स करणाऱ्या मुलींकडे पाहत आहे. कुत्र्याची कृती अनेकांना आवडली आहे.
इंस्टाग्रामवरती डॉग इन्फॉर्मेशन केरल या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ कोणत्या परिसरातील आहे, याची खात्री झालेली नाही. विशेष म्हणजे कुत्रा स्टेजवरती गेल्यानंतर तिथं मुलींचा डान्स पाहण्यात गुंग झाला आहे. खुष झाल्यानंतर तो कुत्रा आपली शेपूट हालवत आहे. त्यानंतर स्टेजवर एकजण जातो आणि कुत्र्याला ताब्यात घेतो.
View this post on Instagram
व्हिडीओने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
स्टेजवर चढून मुलींचा डान्स पाहणाऱ्या कुत्र्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक लोकांना आवडला आहे. आतापर्यंत त्या व्हिडीओ 15 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अधिक मजेशीर कमेंट देत आहेत. एका युजर्सने कुत्र्याचे अतिशय मजेदार वर्णन केले आहे, तर काही युजर्सचे म्हणणे आहे की हा कुत्रा एखाद्या रॉक स्टारपेक्षा कमी नाही, ज्याने स्टेजवर चढताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.